---Advertisement---

डीआरसाठी आख्खा संघ जमतो, इकडं हसून माझं पोट दुखतं; इंग्लंडच्या दिग्गजाकडून भारताची थट्टा

On: रविवार, ऑगस्ट 15, 2021 4:26 PM
---Advertisement---

इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात लॉर्ड्स येथे दुसरा कसोटी सामना सुरू आहे. दरम्यान भारतीय संघ त्यांच्या डीआरएसच्या निर्णयामुळे चांगलाच ट्रोल होतो आहे. नुकतेच इंग्लंड क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मायकल वाॅनने भारतीय संघाने घेतलेल्या डीआरएसच्या निर्णयाविषयी प्रतिक्रिया दिली आहे. जेव्हा डीआरएस घेण्याची वेळ येते तेव्हा पूर्ण भारतीय संघ एकत्र जमा होतो. हे पाहून आपल्याला खूप हसू येत असल्याचे सांगत त्याने भारतीय संघाची थट्टा केली आहे.

इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वाॅनने भारतीय संघाच्या डीआरएसच्या खराब निर्णयावरून त्याची प्रतिक्रिया दिली आहे. त्याने क्रिकबजसोबत बोलताना म्हटले, “मी जेव्हा पाहतो की डीआरएससाठी संपूर्ण भारतीय संघ एकत्र आला आहे; तेव्हा मी जोरजोरात हसू लागतो. असे वाटते की सगळ्या जगातली सरकारे एकत्र झाली आहेत. डीआरएसवर निर्णय घेण्यासाठी त्यांना संसदेत बदल करण्याची गरज आहे. हे काम करत नाहीये आणि आता दुसऱ्या लेकांना आणण्याची गरज आहे.”

“इंग्लंडचा संघ डीआरएसच्या बाबतीत भारतापेक्षा खुप चांगली आहे. जर या गोष्टीवर मालिकेचा निकाल लागला असता की डीआरएस घेण्यामध्ये सगळ्यात चांगल कोण तर, इंग्लंडचा नक्कीच विजय झाला असता,” असेही त्याने म्हटले.

मायकल वाॅनप्रमाणेच भारताचा माजी दिग्गज खेळाडू वीवीएस लक्ष्मणनेही भारतीय संघाच्या डीआरएस घेण्याच्या पद्धतीवर प्रश्न उपस्थित केला आहे. तो म्हणाला, “विराट कोहलीने भावनिक होऊन डीआरएस घेतला नाही पाहिजे. खुप सारे लोक एकत्र गोळा होतात त्यामुळे कर्णधार गोंधळून जातो. गोलंदाजाला वाटते प्रत्येक चेंडू हिट होत आहे. अशा वेळी कर्णधाराने शांत राहून निर्णय घेतला पाहिजे. डीआरएस घेताना तुम्ही भावनांमध्ये नाही वाहू शकत. एका डीआरएसमुळे तुम्ही सामनाही हारू शकता.”

कर्णधार विराट कोहलीने लाॅर्ड्स स्टेडियमवर मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर दोन डीआरएस घेतले होते. या दोन्हींचा निकाल फलंदांजाच्या बाजूने लागला होता. त्याच्या या निर्णयामुळे भारतीय संघाचे डीआरएस वाया गेले होते. यानंतर कर्णधारावर अनेकांनी निशाणा साधला होता.

महत्त्वाच्या बातम्या-

सामना सुरू असताना लॉर्ड्सच्या बाल्कनीत रवी शास्त्री घेत होते डुलक्या, फोटो होतोय तुफान व्हायरल

गोलंदाजीचा भरपूर अनुभव असूनही बुमराहकडून ‘घोडचूक’, शेवटचे षटक टाकायला लावली तब्बल १५ मिनिटे

लॉर्ड्स कसोटीत नेहराच्या तोंडून निघाले असे शब्द अन् पुढच्याच चेंडूवर पंत बाद, झाला भरपूर ट्रोल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---