---Advertisement---

कोलकातामध्ये दिसला कुलदीप यादवचा कहर! गेल्या सामन्यातील ‘शतकवीर’ शनाकाला केले बोल्ड

On: गुरूवार, जानेवारी 12, 2023 5:01 PM
Kuldeep Yadav bowled Dasun Shanaka
---Advertisement---

श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारतीय गोलंदाजांचा दबदबा दिसला. गुरूवारी (12 जानेवारी) कोलकातामध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma)याने युझवेंद्र चहलला बाकावर बसवत कुलदीप यादव (Kuldeep Yadav)याच्यावर विश्वास दाखवला. कुलदीपनेही कर्णधाराचा विश्वास कायम राखत मागील सामन्यात नाबाद शतकी खेळी करणारा श्रीलंकेचा कर्णधार दसुन शनाका याला खेळपट्टीवर अधिक काळ टिकूच दिले नाही. त्याने ज्याप्रकारे शनाकाला बाद केले त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

गुवाहाटीमध्ये शनाकाने नाबाद 108 धावा केल्या होत्या, तो कोलकाताच्या सामन्यात 2 धावा करत तंबूत परतला. कुलदीपने त्याला 23व्या षटकातील पाचवा चेंडू असा टाकला ज्यावर शनाकाला पुढे येत नीट शॉट मारता आलाच नाही आणि तो चेंडू पॅडला लागून लेग स्टम्पला लागला. शनाका गेला आणि श्रीलंकेचा डाव अडचणीत आला, कारण तो बाद झाल्यानंतर संघाची स्थिती 5 बाद 126 अशी झाली होती.

कुलदीपने या सामन्यात श्रीलंकेच्या कुशल मेंडिस आणि चरिथ असालंका यांनाही बाद केले. त्याला पहिल्या वनडेत घेतले नव्हते. दुसऱ्या वनडेमध्ये तर त्याने महत्वाच्या विकेट्स घेत श्रीलंकेचा डाव संथ केला. त्याने 10 षटकात 51 धावा देत 3 विकेट्स घेतल्या.

या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याला भारतीय गोलंदाजांनी चुकीचा ठरवला. सुरूवातीला तर मोहम्मद सिराजने अविष्का फर्नांडो याला बाद करत श्रीलंकेला पहिला धक्का दिला होता. त्यानंतर कुलदीपने अक्षर पटेल (1 विकेट) याच्या साथीने श्रीलंकेसाठी फलंदाजी कठीण केली. ही खेळपट्टी वेगवान गोलंदाजांसाठी अधिक पूरक असल्याचे म्हटले जाते. त्यावरच भारताच्या फिरकीपटूंनी उत्तम खेळ केला. उमरान मलिक याने 2 आणि मोहम्मद सिराजने 3 विकेट्स घेतल्या. यामुळे श्रीलंकेचा डाव 215 धावसंख्येवरच संपुष्टात आला

तीन सामन्यांच्या या वनडे मालिकेत भारत 1-0 असा पुढे आहे. तसेच याआधी झालेल्या टी20 मालिकेतही भारत हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याच्या नेतृत्वाखाली 2-1 असा जिंकला होता.

शनाकाच्या विकेटचा व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मिकी आर्थरकडून पीसीबीचा अपमान! विश्वास नाही म्हणत नाकारला मोठा प्रस्ताव
पॉवरप्लेमध्ये सिराजने पुन्हा दाखवली गुणवत्ता! घातक चेंडूवर अविष्का फर्नांडो त्रिफळाचीत, व्हिडिओ पाहाच

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---