भारत विरुद्ध श्रीलंका (INDvSL) यांच्यात मालिकेतील दुसरा टी20 सामना गुरूवारी (5 जानेवारी) खेळला गेला. पुण्यात झालेल्या या सामन्यात श्रीलंकेने बाजी मारत मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली. हा सामना पाहुण्या संघाने 16 धावांनी जिंकला. हा सामना भारताचा युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग (Arshdeep Singh)याच्यासाठी एक न विसरणारा क्षण ठरला आहे. त्याने टाकलेल्या असंख्य नो-बॉलमुळे चाहते त्याच्यावर चांगलेच संतापले असून काहींनी सोशल मीडियावर त्यांचा राग व्यक्त केला आहे.
या सामन्यात अर्शदीपने दोन षटके टाकताना 18.50च्या इकॉनॉमी रेटने तब्बल 37 धावा दिल्या. यामधील दुसऱ्या षटकात त्याने लागोपाठ तीन नो-बॉल टाकले. त्याच्या या वाईट कामगिरीबाबत चाहत्यांनी सोशल मीडियावर टीकांचा पाऊस पाडला आहे. त्याने दोन षटकात 4, 0, 0, 1, 0, नो-बॉल, नो-बॉल+4, नो-बॉल+6, 1, 1, 4, 2, नो-बॉल, 6, नो-बॉल+1, 0, 2 अशा धावा दिल्या.
https://twitter.com/MK_Chaudhary04/status/1610996694166142982?s=20&t=y1BwuN5W805Syz6BXw-sGQ
आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये अर्शदीप भारताकडून सर्वाधिक नो-बॉल टाकणारा खेळाडू ठरला आहे. त्याने 22 सामन्यात 12 नो-बॉल टाकले आहेत. आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक नो-बॉल टाकण्याचा विक्रम दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज मोर्ने मॉर्केल (19) याच्या नावावर आहे.
Arshdeep Singh bowled hat-trick of no balls in an over.#ArshdeepSingh #INDvsSL pic.twitter.com/61DT1O3aQo
— Abdullah Neaz (@Neaz__Abdullah) January 5, 2023
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये श्रीलंकेने 20 षटकात 6 विकेट्स गमावत 206 धावा केल्या. श्रीलंकेकडून सर्वाधिक धावा कर्णधार दसुन शनाका याने केल्या. त्याने 22 चेंडूत 2 चौकार आणि 6 षटकार मारत नाबाद 56 धावा केल्या.
लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरूवातच अडखळत झाली. भारताने पहिल्या 5 विकेट्स अवघ्या 57 धावसंख्येवरच गमावल्या. तरीही सूर्यकुमार कुमार (51) आणि अक्षर पटेल (65) यांनी कसातरी भारताचा डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. तरीही 16 धावा कमीच पडल्या.
या मालिकेत भारताने पहिला सामना जिंकला होता. आता श्रीलंकेने दुसरा सामना जिंकल्याने 7 जानेवारीला राजकोट येथे होणारा तिसरा टी20 सामनाही रोमांचक होण्याची दाट शक्यता आहे. कारण दोन्ही संघ मालिका जिंकण्याच्या प्रयत्नात असणार आहेत. (INDvSL 2nd T20 Arshdeep Singh fans furious over his continuous no ball)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग 5- लढवय्या साईराज बहुतुले!
पीवायसी फिल्ट्रम चॅलेंजर करंडकात पहिल्या डावाच्या आघाडीच्या जोरावर हिंदू जिमखाना, डीव्हीसीए-केडन्स विजयी