भारत विरुद्ध श्रीलंका (INDvSL) यांच्यात वनडे मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना तिरुअनंतरपुरम येथे रविवारी (15 जानेवारी) खेळला जाणार आहे. भारत आधीच दोन वनडे सामने जिंकत 2-0 असा आघाडीवर आहे. आता भारताची नजर क्लीन स्वीपवर आहे. भारताने मालिका जिंकली आहे, यामुळे तिसऱ्या सामन्यात बाकावर बसलेल्या खेळाडूंना संधी मिळू शकते.
फलंदाजीत पाहिले तर बदलाची शक्यता फारच कमी आहे, मात्र या मालिकेनंतर भारताला लगेचच न्यूझीलंड विरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे. यामुळे गोलंदाजीत बदल होऊ शकतो. न्यूझीलंडने नुकतेच पाकिस्तानचा पाकिस्तानमध्ये पराभव केला आहे. यामुळे कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) गोलंदाजी विभाग बळकट करण्यासाठी श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात बदल करू शकतो.
संघ व्यवस्थापकांना मोहम्मद शमी वरचा भार कमी करण्याची चिंता आहे. कारण जसप्रीत बुमराह आधीच दुखापतग्रस्त आहे. त्यातच पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका खेळायची आहे. यामुळे तिसऱ्या वनडेत अर्शदीप सिंगला अंतिम अकरामध्ये जागा मिळण्याची दाट शक्यता आहे. तो नव्या चेंडूबरोबरच डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजी करतो. त्याचबरोबर युझवेंद्र चहल दुखापतीमुळे कोलकातामध्ये झालेल्या दुसऱ्या वनडेतून बाहेर होता. यामुळे कुलदीप यादव याची निवड झाली होती आणि त्याने उत्तम कामगिरी करत सामनावीराचा पुरस्कारही पटकवला होता. यामुळे चहलला तिसऱ्या वनडेत खेळता येणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह आहे. वॉशिंग्टन सुंदर याचेही संघात पुनरागमन होऊ शकते.
श्रीलंकेच्या संघातही दोन खेळाडू दुखापतग्रस्त आहेत. दिलशान मधुशंका खांद्याच्या आणि पथुम निसांका पाठीच्या दुखापतीमुळे त्रस्त आहेत.
भारताची संभावित प्लेईंग इलेव्हन- रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल/ वॉशिंंग्टन सुंदर, मोहम्मद शमी/अर्शदीप सिंग, उमरान मलिक, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव/युझवेंद्र चहल.
श्रीलंकेची संभावित प्लेईंग इलेव्हन- नुवानिडू फर्नांडो, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस (विकेटकीपर), चारिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, दसुन शनाका (कर्णधार), वानिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, दुनिथ वेललागे, लाहिरू कुमारा, कसून राजिथा.
(INDvSL 3rd ODI India playing XI will Rohit Sharma change in batting)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
धोनीचं ‘असं’ कौतुक आजपर्यंत कुणीही केलं नसेल, वाचा ‘माही’च्या प्रभावाबाबत काय म्हणाला दिग्गज खेळाडू
एका षटकात शेफालीने भारतासाठी सोपा केला विजय, 19 वर्षांखालील महिला विश्वचषकात भारताचा पहिला विजय