---Advertisement---

40 वर्षापासून श्रीलंका भारतात फेल! सूर्य खेळीने विजय साकार, भारताच्या यशाचे काही बलाढ्य रेकॉर्ड्स

On: रविवार, जानेवारी 8, 2023 3:09 PM
Indian Cricket Team
---Advertisement---

भारत विरुद्ध श्रीलंका (INDvSL) यांच्यात तीन सामन्यांची टी20 मालिका खेळली गेली. हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वाखाली खेळताना भारताने घरच्या मैदानावर ही मालिका 2-1 अशी जिंकली. तिसरा सामना शनिवारी (7 जानेवारी) राजकोट येथे खेळला गेला. ज्यामध्ये भारताने 91 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात सूर्यकुमार यादव याने तुफानी शतकी खेळी केली आणि अनेक विक्रम केले. भारत जिंकल्याने संघानेही मोठा इतिहास रचला.

भारताने सलग पाचव्यांदा घरच्या मैदानावर श्रीलंकेला टी20 मालिकेत पराभूत केले आहे. या दोन्ही संघात आतापर्यंत 6 टी20 मालिका खेळल्या गेल्या, ज्यामधील पहिली मालिका 2009 ला खेळली गेली. ही मालिका 1-1 अशी बरोबरीत राहिली होती. त्यानंतर श्रीलंका भारताला भारतात टी20 मालिकेत पराभूत करू शकला नाही.

एवढेच नाही भारताने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारामध्ये श्रीलंकेविरुद्ध 25 द्विपक्षिय मालिका खेळल्या आहेत. यातील एकही मालिका श्रीलंकेने जिंकली नाही. यामुळे भारत हा एकमेव असा देश आहे, जेथे श्रीलंका क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात अपयशी ठरली आहे. भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात सर्वप्रथम मालिका 1982मध्ये खेळली गेला होती.

या मालिकेनंतर भारताने 2019मध्ये घरच्या मैदानावर टी20 मालिका जिंकण्याचे सत्र सुरुच ठेवले आहे. 2012 पासून भारताने 12 मालिका खेळल्या असून 10 मालिका जिंकल्या. दोन मालिका अनिर्णात राहिल्या. त्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेल्या होत्या.

भारताने चौथ्यांदा श्रीलंकेविरुद्ध टी20मध्ये 200 पेक्षा अधिक धावसंख्या उभारली आहे. याआधी भारताने केवळ इंग्लंडविरुद्ध चौथ्यांदा 200 पेक्षा अधिक धावा केल्या होत्या. त्याचबरोबर घरच्या मैदानावर भारताची ही टी20मधील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा विजय ठरला आहे. विशेष म्हणजे पहिला मोठा विजय श्रीलंकेविरुद्ध आहे. 2017ला कटकमध्ये झालेल्या त्या सामन्यात भारत 93 धावांनी जिंकला होता.

सूर्यकुमारच्या विक्रमांकडे पाहिले तर तो आंतरराष्ट्रीय टी20मध्ये तिसरे शतक करणारा रोहित शर्मा नंतरचा दुसराच भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याचबरोबर त्याने 1500 धावांचा टप्पादेखील गाठला. त्याने 843 चेंडूतच 1500 धावा पूर्ण केल्या. यामुळे तो सर्वात जलद (चेंडूच्या बाबतीत) आंतरराष्ट्रीय टी20मध्ये दीड हजार धावांचा टप्पा गाठणारा फलंदाज ठरला.

(INDvSL 3rd T20 Rajkot Suryakumar Yadav Century and Team India Records)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आयपीएल न खेळता पंत मालामाल! बीसीसीआय मोजणार 21 कोटींची रक्कम
‘श्रीलंकेविरुद्धची मालिका आयपीएल लिलावाआधी झाली असती तर…’, गंभीरचे शनाकाविषयी मोठे भाष्य

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---