---Advertisement---

“शाळेत जा आणि नेतृत्व शिक”, दिग्गजाचा कॅप्टन गिलला सल्ला

On: सोमवार, जानेवारी 19, 2026 6:13 PM
---Advertisement---

नुकतेच भारताने शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली घरच्या मैदानावर वनडे मालिका गमावली. न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत भारत १-२ असा पराभूत झाला. यामधील रविवारी (१८ जानेवारी) झालेला तिसरा आणि मालिका निर्णायक सामना भारताने ४१ धावांनी गमावला. या मालिकेत गिलचे नेतृत्व कुठे-कुठे चुकले याचा अंदाज क्रिकेटज्ञानी लावत आहेत. अशातच एकाने तर गिलला ‘शाळेत जा आणि नेतृत्व कसे करायचे हे शिक’ असा सल्ला दिला आहे.

न्यूझीलंडकडून पराभूत झाल्यावर चोहोबाजूंनी गिलच्या नेतृत्वावर प्रश्न निर्माण होत आहेत. यामध्ये पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटूने देखील उडी घेतली. बसित अली याने गिलच्या नेतृत्वावर टीका केली आहे. त्यांनी त्यांच्या युट्युबच्या ‘द गेम प्लान’ या कार्यक्रमात टोमणा मारताना म्हटले, “विजयाचे श्रेय भारताच्या कर्णधाराला जाते. भारत हार्दिक पंड्या आणि जसप्रीत बुमराह यांच्याशिवाय खेळत आहे, तर शमीला संघात घेतले जात नाही. संघ केवळ रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यावर अवलंबून आहे. राहुल पहिल्या दोन सामन्यात खेळला, मात्र तिसऱ्या सामन्यात लवकर बाद झाला. बाकीचे काय करत होते मग?”

“न्यूझीलंडने जेव्हा पहिल्या वनडेत ३००च्या आसपास धावा केल्या होत्या तेव्हाच त्यांनी आपले लक्ष्य साध्य केले होते. भारताकडे वेगवान गोलंदाज वगळले तर महत्वाचा गोलंदाज कोण आहे? कुलदीप यादव आणि रविंद्र जडेजा. तुमच्याकडे मुख्य गोलंदाज असूनसुद्धा तुम्ही नीतीश रेड्डीकडून गोलंदाजी करवता. यावरून गिल शान मसूदची नक्कल करण्याचा प्रयत्न करत आहे. ड्रेसिंग रूममधून जी टीप आली त्याचे पालन करतो. भारताला सुरूवातीला विकेट्सची घेण्याची आवश्यकता होती”, असेही अली यांनी पुढे म्हटले आहे.

ऑस्ट्रेलिया पाठोपाठ न्यूझीलंडविरुद्धही मालिका गमावल्याने गिलचे वनडे नेतृत्व पदार्पण स्वप्नवत झाले नाही. न्यूझीलंडची मालिका तर घरच्याच मैदानावर गमावल्याने तर आणखी वाईट वाटत आहे. त्यात या न्यूझीलंडच्या संघात अनेक अनुभवी खेळाडू नव्हते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---