---Advertisement---

व्हिडिओ: भारत विरुद्ध न्यूझीलंड टी20 मालिकेची ट्रॉफी आहे खास, क्रिकेटसाठी क्रिकेटमधून बनवलेली

On: गुरूवार, जानेवारी 22, 2026 2:22 PM
---Advertisement---

क्रिकेटविश्वात सध्या टी२०-वनडे मालिका सुरू आहेत. या मालिकांसाठी असलेल्या काही खास ट्रॉफी त्यांच्या विविधतेमुळे चर्चेत आल्या. त्यातील एक भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात खेळली जाणारी टी२० मालिकेची ट्रॉफी. या ट्रॉफीचा एक व्हिडिओ भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) त्यांच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर पोस्ट केला. जो सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

याआधीही काही विशेष चषके त्यांच्या आकारांमुळे चर्चेत आली होती. त्यात ऍशेस चषक, आयसीसी कसोटी चॅम्पियनशीप, पाकिस्तान-न्यूझीलंडमधील ओए-होय ट्रॉफी आणि इतर यांचा समावेश आहे. आता त्यात भारत विरुद्ध न्यूझीलंड टी२० मालिका आणि श्रीलंका विरुद्ध इंग्लंड वनडे मालिका (डॅमरो कप) या ट्रॉफींची भर पडली आहे.

भारत विरुद्ध न्यूझीलंड टी२० मालिका जो संघ जिंकेल त्यांच्यासाठी जी ट्रॉफी बनवली आहे, ती क्रिकेटपासून क्रिकेटसाठी बनवलेली ट्रॉफी आहे. त्यामध्ये जुन्या बॅट-बॉलचे भाग वापरले आहेत. या ट्रॉफीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. त्यासाठी बीसीसीआयचे कौतुक करावे तेवढे कमी.

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी२० मालिका खेळली जात आहे. यातील पहिला सामना बुधवारी (२१ जानेवारी) नागपूर येथे खेळला गेला. या सामन्यात भारताने नाणेफेक गमावत प्रथम फलंदाजी केली. त्यामध्ये स्फोटक फलंदाज अभिषेक शर्माच्या ८४ धावा (३५ चेंडू) आणि रिंकू सिंगची शेवटच्या षटकातील ताबडतोब फलंदाजी यामुळे भारताने २० षटकात ७ विकेट्स गमावत २३८ धावा केल्या. त्यात रिंकूने २० चेंडूत ४४ धावा केल्या.

लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरूवात खराब झाली. भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग याने त्याच्या पहिल्याच षटकात त्यांना पहिला धक्का दिला. त्याने डेवॉन कॉनवेला शून्यावर बाद केले. न्यूझीलंडने पहिल्या दोन विकेट अवघ्या पहिल्या दोन षटकातच गमावल्या. त्यानंतर ग्लेन फिलिप्सने काही काळ भारताला अडचणीत आणले होते. तो ४० चेंडूत ७८ धावा करत बाद झाला. हा सामना भारताने ४८ धावांनी जिंकला.

या मालिकेतील दुसरा सामना रायपूर येथे शुक्रवारी (२३ जानेवारी) खेळला जाणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---