---Advertisement---

INDvsNZ ODI: इंदौरची खेळपट्टी काय सांगते? गोलंदाजांची नाहीतर फलंदाजांची बल्ले-बल्ले, वाचा पिच रिपोर्ट

On: रविवार, जानेवारी 18, 2026 9:01 AM
---Advertisement---

जानेवारी ११ पासून सुरू झालेली भारत विरुद्ध न्यूझीलंड वनडे मालिका शेवटाकडे आलेली आहे. तीन सामन्यांची ही मालिका १-१ अशी बरोबरीत असून तिसरा आणि मालिका निर्णायक सामना इंदौरमध्ये रविवारी (१८ जानेवारी) खेळला जाणार आहे. हा सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघाचे खेळाडू चांगलेच तयारीला लागले असून चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अशातच होळकर स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात कोणीची बॅट तळपेल याचे तर्क-वितर्क लावले जात आहेत. याच स्टेडियवर मागील काही सामन्यांची आकडेवारी पाहिली तर खेळपट्टी फलंदाजांसाठी पूरक ठरली आहे.

काळ्या मातीच्या या खेळपट्टीवर चेंडू मध्यम उसळी घेतो, तसेच सीमारेषाही छोटी आहे. याच मैदानावर भारताचा एकेकाळचा स्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवागने वेस्ट इंडिज विरुद्ध द्विशतक केले हेते. या सामन्यात त्याने १४९ चेंडूत २१९ धावा केल्या होत्या.

त्याचबरोबर भारताने या मैदानावर न्यूझीलंड विरुद्ध शेवटचा वनडे सामना जानेवारी २०२३मध्ये खेळला होता. जो भारताने ९० धावांनी जिंकला होता. यामध्ये रोहित शर्मा आणि कर्णधार शुबमन गिल यांनी शतके केली होती. त्याचबरोबर भारताने या मैदानावर त्यांचा शेवटचा वनडे सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध स्पटेंबर २०२३ खेळला होता. हा सामना भारताने ९९ धावांनी जिंकला होता. यामध्ये गिलने (१०४ धावा, ९७ चेंडू) शतकी खेळी केली होती. तसेच १०५ (९०) धावा करणारा श्रेयस अय्यर सामनावीर ठरला होता.

यामुळे ही आकडेवारी पाहता भारताकडून रोहित, गिल, विराट कोहली की श्रेयस हे शतकी खेळी करणार की नाही याची अपेक्षा आहे.

दोन्ही संघाचे संभाव्य अंतिम अकरा खेळाडू

भारत– शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के एल राहुल (विकेटकीपर) रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग.

न्यूझीलंड– डेव्हॉन कॉनवे, हेन्री निकल्स, विल यंग, ​​डॅरिल मिचेल, ग्लेन फिलिप्स, मिचेल हे (विकेटकीपर) मायकेल ब्रेसवेल (कर्णधार), झॅक्री फाउल्क्स, क्रिस्टियन क्लार्क, काइल जेमिसन, जेडन लेनॉक्स.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---