---Advertisement---

INDvsWI: दुसऱ्या वनडेत वेस्ट इंडिजने जिंकला टॉस; केएल राहुलचे पुनरागमन, तर पोलार्ड बाहेर

Rohit-Sharma-Nicholas-Pooran
---Advertisement---

अहमदाबाद। भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (India vs West Indies) संघात सध्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ३ सामन्यांची वनडे मालिका (ODI Series) सुरू आहे. या मालिकेतील दुसरा सामना (2nd ODI) बुधवारी (९ फेब्रुवारी) झाला. या सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. 

या सामन्यातून वेस्ट इंडिजचा नियमित कर्णधार कायरन पोलार्ड (Kieron Pollard) बाहेर झाला. त्याला छोटी दुखापत असल्याचे सामन्यात आले. त्यामुळे या सामन्यात निकोलस पूरन वेस्ट इंडिजने प्रभारी कर्णधारपद सांभाळले. पोलार्डऐवजी ओडियन स्मिथला संधी देण्यात आली.

तसेच भारताच्या अंतिम ११ जणांच्या संघात देखीस एक बदल करण्यात आला असून इशान किशन ऐवजी केएल राहुलने (KL Rahul) पुनरागमन झाले आहे. केएल राहुल बहिणीच्या लग्नाच्या निमित्ताने पहिल्या सामन्यातून बाहेर होता. पण, तो दुसऱ्या सामन्यासाठी संघात परतला.

या मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकला होता, त्यामुळे दुसरा सामना जिंकून मालिका खिशात घालण्याची भारतीय संघाकडे संधी होती. तसेच वेस्ट इंडिजला मालिकेत बरोबरी करण्यासाठी आणि आपले आव्हान टिकवून ठेवण्यासाठी या सामन्यात विजयाची गरज होती.

असे आहेत ११ जणांचे दोन्ही संघ – 

वेस्ट इंडिज: शाय होप (यष्टीरक्षक), ब्रेंडन किंग, डॅरेन ब्राव्हो, शमारह ब्रूक्स, निकोलस पूरन (कर्णधार), जेसन होल्डर, अकिल हुसैन, फॅबियन ऍलन, ओडियन स्मिथ, अल्झारी जोसेफ, केमार रोच

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, रिषभ पंत, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, युझवेंद्र चहल, प्रसिद्ध कृष्णा.

महत्त्वाच्या बातम्या – 

वडिलांची नजर चुकवून खेळायचा क्रिकेट, आता ठरला १९ वर्षाखालील विश्वचषकाचा हिरो

केएल राहुल इन, ईशान आऊट; तर कुलदीपच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह; अशी असू शकते ‘प्लेइंग ११’

जेसन रॉयवर मेगा लिलावात बरसणार पैसा; पीएसएलमध्ये आणले वादळ

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---