भारतीय महिला संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे. उभय संघांतील तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना शनिवारी, 24 सप्टेंबर ऐतिहासिक लॉर्ड्स स्टेडियमवर खेळला गेला. भारताची दिग्गज वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी हिच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा हा शेवटचा सामना होता. भारतीय फलंदाज स्वस्तात बाद झाल्यामुळे या सामन्यात झुलनला फलंदाजी देखील करता आली. यावेळी इंग्लंडचा संपूर्ण संघ तिला ‘गार्ड ऑफ ऑनर’ देण्यासाठी जमला होता.
भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धच्या या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात अपेक्षित प्रदर्शन केले नाही. संघ प्रथम फलंदाजीसाठी आला पण सर्वच्या सर्व 50 षटके देखील खेळून काढू शकला नाही. वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी (Jhulan Goswami) एक चेंडू खेळली आणि त्यावर विकेट देखील गमावली. शेवटच्या आंतरराष्ट्रीय सामन्यात जरी तिने शुन्य धावांवर विकेट गमावली असली, तरी तिची कारकिर्द मात्र नक्कीच जबरदस्त राहिली आहे. महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या या दिग्गज गोलंदाजासाठी इंग्लंड संघाने शेवटच्या सामन्यात ‘गार्ड ऑफ ऑनर’ दिला. इंग्लंड क्रिकेटच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून हा व्हिडिओ शेअर केला गेला आहे.
For over 20 years Jhulan Goswami has run in, hit a length and blazed a trail.
She has bowled nearly 10,000 balls in ODI cricket, and she may just have inspired as many young girls to try cricket.
Thanks @JhulanG10, you’re an inspiration. pic.twitter.com/EMeCtAA5Wa
— England Cricket (@englandcricket) September 24, 2022
सामन्याचा विचार केला, तर नाणेफेक गमावल्यानंतर भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करावी लागली. इंग्लंड संघाने घेतलेला हा निर्णय अगदी योग्य ठरल्याचे दिसले. भारताचा संपूर्ण संघ 45.4 षटकांमध्ये 169 धावा करून सर्वबाद झाला. इंग्लंडचे गोलंदाजी आक्रमण भारतावर भारी पडले असले, तरी सलामीवीर स्मृती मंधाना आणि अष्टपैलू दिप्ती शर्मा यांनी अर्धशतकी योगदान दिले. मंधानाने 79 चेंडूत 50 धावा केल्या, तर दीप्तीने 106 चेंडूत 68 धावा केल्या. इंग्लंडसाठी केट क्रॉस सर्वात जास्त 4 विकेट्स घेऊ शकली.
झुलनच्या कारकिर्दीचा विचार केला, तर तिने 6 जानेवारी 2002 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यातून भारतासाठी पदार्पण केले होते. मागच्या तब्बल 20 वर्षांमध्ये तिने अनेक विक्रमांची नोंद केली. त्यापैकी अनेक विक्रम आजही अबाधित आहेत. 203 एकदिवसीय सामन्यांमध्ये तिच्या नावावर 253 विकेट्सची नोंद आहे. टी-20 क्रिकेटमध्ये 68 विकेट्स खेळलेल्या झुलनने 56 विकेट्स घेतल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये तिने 12 सामने खेळले असून यामध्ये 44 विकेट्स घेतल्या आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘मी विजयाचे श्रेय घेत नाही…’, सामना जिंकल्यानंतर कार्तिकने रोहितचेच केले कौतुक
आता अर्जुन तेंडुलकरचे प्रदर्शन सुधारणार! सचिनने ‘या’ कडक प्रशिक्षकांच्या हवाली केला मुलगा
झुलन गोस्वामीला निरोप देताना ढसाढसा रडली कर्णधार हरमप्रीत, व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल भावूक