सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कसोटी क्रिकेटचे वारे वाहत आहेत. इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड सामना, दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडीज सामना आणि १८ जूनपासून सुरु होणारा विश्व कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना. अशातच मग महिला संघ का मागे राहील. १६ जून पासून भारतीय महिला सुद्धा इंग्लंड महिला संघाबरोबर दोन हात करण्यास सज्ज झाल्या आहेत. भारतीय महिला संघ ७ वर्षांनंतर आपला कसोटी सामना खेळेल. हा सामना इंग्लंडच्या ब्रिस्टेल मैदनावर दुपारी ३.३० वाजतापासून सुरू होणार आहे. दरम्यान, माजी भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने भारतीय युवा फलंदाज शेफाली वर्माबद्दल वक्तव्य केले आहे.
महान फलंदाज सचिन तेंडुलकरचे म्हणणे आहे की, शेफाली वर्माला पदार्पण करण्याची संधी मिळाली तर, ती या सामन्यात चांगली फलंदाजी करू शकते. शेफाली जेव्हा खेळपट्टीवर असते तेव्हा तिची प्रतिभा आणि फटके खेळण्याची क्षमता प्रेक्षकांना आकर्षित करते. मास्तर ब्लास्टर सचिनने शेफालीला येत्या कसोटी सामन्यासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.
आपल्या आक्रमक खेळीने महिला क्रिकेटमध्ये नाव कमावणारी १७ वर्षीय शेफालीने, सचिनला त्याच्या १६व्या वर्षी केलेल्या पदार्पणाची आठवण करून दिली. ज्यावेळेस सचिनने वेगवान गोलंदाज वसिम अक्रम आणि वकार युनिस यांचा सामना केला होता.
सचिनने सांगितले की, “काही वर्षांपुर्वी जंगलाला लागलेल्या आगीमध्ये बऱ्याचशा लोकांना नुकसान झाले होते. त्यावेळेस त्यांना पैसे मिळावे यासाठी आम्ही ऑस्ट्रेलियामध्ये क्रिकेटचा सामना खेळत होतो. तेव्हा माझी शेफालीसोबत भेट झाली. त्यावेळेस आम्ही क्रिकेटवर भरपूर चर्चा केली होती. मी तिला सांगितले होते की, मला तुझी फलंदाजी आणि फटके खेळण्याचा अंदाज आवडतो. मी तिला अजून मेहनत करायचा सल्ला दिला होता.”
सचिनला विश्वास आहे की, शेफाली वर्माला जर इंग्लंडविरुद्ध पदार्पण करण्याची संधी मिळाली तर ती चांगले प्रदर्शन करेल. सचिनने सांगितले, “१७ वर्षाच्या खेळाडूंमध्ये जो उत्साह आणि जोश असतो, तो तिच्यात झळकून दिसतो. येत्या काळात शेफाली भारतीय नाही तर विश्व क्रिकेटमध्ये आपले नाव करेल.”
महत्त्वाच्या बातम्या-
आजपासून होणार भारत-इंग्लंड महिला संघांची लढत, जाणून घ्या सामन्याबद्दल सर्वकाही
‘कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना माझ्यासाठी विश्वचषकाहून कमी नाही,’ पुजाराने फुंकले रणसिंग
‘हा’ खेळाडू भारताचा ठरेल एक्स फॅक्टर, एका तासात जिंकवेल सामना; बड्या फलंदाजांचा दावा