तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील शेवटच्या सामन्यात मंगळवारी (29 ऑक्टोबर) जेव्हा भारतीय महिला संघ न्यूझीलंडविरुद्ध मैदानात उतरेल, तेव्हा त्यांच्या फलंदाजांना मालिका जिंकण्यासाठी चांगली कामगिरी करावी लागेल. रविवारी झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजी सपशेल फसली होती. विजयासाठी 260 धावांचा पाठलाग करताना भारताने 108 धावांत आठ विकेट्स गमावल्या. राधा यादव (48) आणि सायमा ठाकोर (29) यांनी नवव्या विकेटसाठी 70 धावांची भागीदारी करत संघाला चांगल्या स्थितीत आणण्याचा प्रयत्न केला. परंतु भारतीय संघ 183 धावांवर सर्वबाद झाला. तत्पूर्वी, मालिकेतील सलामीच्या सामन्यातही भारतीय गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करत संघाला 59 धावांनी विजय मिळवून दिला होता.
भारतीय त्रिकुटाला आपली ताकद दाखवावी लागणार आहे
मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये एकाही भारतीय फलंदाजाला अर्धशतक करता आलेले नाही. त्यामुळे निर्णायक सामन्यात भारताच्या कर्णधार हरमनप्रीत कौर, सलामीवीर स्म्रीती मंधाना आणि शेफाली वर्मा या त्रिकुटाला ताकद दाखवावी लागणार आहे. मधल्या फळीतील जेमिमाह रोड्रिगेज, दीप्ती शर्मा आणि तेजल हसबनीस चांगल्या सुरुवातीचे मोठ्या धावसंख्येमध्ये रूपांतर करण्यात अपयशी ठरले आहेत. मंधानाच्या खराब फॉर्ममुळे भारताला सर्वात मोठी समस्या भेडसावत आहे. जगातील सर्वोत्तम सलामीवीरांपैकी एक मंधाना गेल्या काही सामन्यांमध्ये धावा काढण्यासाठी संघर्ष करत आहे. मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात तिने दुहेरी आकडाही गाठलेला नाही.
भारतीय गोलंदाजांची कामगिरी वाखाणण्याजोगी होती
दुसरीकडे भारतीय गोलंदाजांची कामगिरी वाखाणण्याजोगी आहे. संघाने सलामीच्या सामन्यात न्यूझीलंडचा डाव 168 धावांत गुंडाळला होता. दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडचा राधा यादवच्या (चार विकेट्स) नेतृत्वाखाली भारतीय गोलंदाजांनी चांगले पुनरागमन करत त्यांचा डाव 259 धावांवर रोखला. न्यूझीलंडसाठीच्या शेवटच्या सामन्यात अनुभवी सुझी बेट्स (58) आणि कर्णधार सोफी डिव्हाईन (79) यांनी उत्कृष्ट फलंदाजी करत संघाचे मनोबल वाढवणारा विजय मिळवला.
आता भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सामना उभय संघातील तिसरा सामना सुरू होईल.
महत्त्वाच्या बातम्या-
IPL 2025; केकेआर ‘या’ 5 खेळाडूंना करणार रिटेन? कर्णधाराचा पत्ता कटणार
AUS vs PAK; टी20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघ जाहीर, पण कर्णधाराचीच नाही केली घोषणा!
पंत नाही तर ‘हा’ होता, बाॅर्डर-गावसकर ट्राॅफी जिंकवणारा खरा हीरो, दिग्गजाचे खळबळजनक वक्तव्य!