महिला टी20 विश्वचषक 2024 मध्ये टीम इंडियाची सुरुवात अपेक्षेप्रमाणे झाली नाही. भारताला स्पर्धेतील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध 58 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. भारतीय महिला क्रिकेट संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक मुनीश बाली यांनी या पराभवाबद्दल दु:ख व्यक्त केले. पण या सामन्यात शानदार क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूंचेही कौतुक केले. ड्रेसिंग रुममध्ये जेमिमाह रॉड्रिग्जला ‘फिल्डर ऑफ द मॅच’चा पुरस्कार देण्यात आला. भारतीय पुरुष क्रिकेट संघाने सामन्यातील सर्वात हुशार क्षेत्ररक्षकाला सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक पदक देण्यास सुरुवात केली होती. जी महिला संघानेही स्वीकारली होती.
बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये मुनीश म्हणाला, “हा एक कठीण खेळ होता. आम्हाला हवी असलेली टूर्नामेंटची सुरुवात झाली नाही. पण तुम्ही पुनरागमन कराल. जर आम्ही आमच्या क्षेत्ररक्षणातील सहावे षटक काढून टाकले (जिथे दोन चुका झाल्या) त्याव्यतीरिक्त आम्ही चांगली कामगिरी केली.” त्यांनी स्मृती मानधना, श्रेयंका पाटील आणि पूजा वस्त्राकर यांच्या क्षेत्ररक्षणाचे कौतुक केले. यानंतर मुनीशने कर्णधार हरमनप्रीत कौरला सर्वोत्तम क्षेत्ररक्षक पदक देण्याची विनंती केली. जेमिमाला पदक दिल्यानंतर हरमनप्रीतने तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि तिला मिठी मारली. मुनीश म्हणाला, “आम्ही क्षेत्ररक्षणात जशी परतफेड केली, तशीच कामगिरी पुढच्या सामन्यातही करू. ऑल द बेस्ट.”
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर न्यूझीलंडने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मर्यादित षटकात किवी संघाने 160 धावा केल्या. तर लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघ 19 षटकात 102 धावांवर गारद झाला. एकाही भारतीय खेळाडूला 20 चा आकडा गाठता आले नाही. आशाप्रकारे न्यूझीलंड सामना 58 धावांनी जिंकला.
सामन्यानंतर हरमनप्रीत म्हणाली, “”आम्ही आमचे सर्वोत्तम क्रिकेट खेळू शकलो नाही. पण आगामी सामन्यांमध्ये आम्ही आमच्या कमकुवतपणा दुरुस्त करू, आता सर्व सामने आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत, आम्हाला आमचे सर्वोत्तम देणे आवश्यक आहे” भारताला स्पर्धेतील आपला दुसरा सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध खेळायचा आहे.
हेही वाचा-
टीम इंडियाचा फुसका बार! विश्वचषकात नोंदल्या गेला लाजिरवाणा रेकॉर्ड
न्यूझीलंडनंतर आता भारतासमोर पाकिस्तानचे आव्हान, सामन्यापूर्वी पाहा हेड टू हेड रेकाॅर्ड
‘आता आमच्यासाठी…’, न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर काय म्हणाली?