भारतीय महिला क्रिकेट संघ आणि दक्षिण आफ्रिका महिला संघ यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आज (19 जून) रोजी बंगळुरु येथे खेळला जात आहे. पहिला एकदिवसीय सामना जिंकून भारतानं मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. तत्पूर्वी भारताची सलामीवीर स्मृती मानधनानं दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातही शतक झळकावलं. स्मृती मानधनानं 103 चेंडूत शतक पूर्ण केले. तर भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरनं देखील आक्रमक अंदाजात फलंदाजी करत शतक झळकावलं.
पहिल्या एकदिवसीय सामन्यात स्मृती मानधानानं (Smriti Mandhana) शतक झळकावलं होतं. तिनं 127 चेंडूत 117 धावांची खेळी खेळली होती. यादरम्यान तिनं 12 चौकारांसह एक उत्तुंग षटकार देखील लगावला होता. परंतु याचं मालिकेत तिनं सलग दुसरे शतक झळकावलं. पहिल्या सामन्यात तिनं सलामीवीर पुरस्कार जिंकला होता. या सामन्यात तिनं 120 चेंडूत 136 धावांची खेळी खेळली आणि सलग 2 एकदिवसीय शतकं झळकावणारी पहिली भारतीय महिला ठरली.
भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरनं (Harmanpreet Kaur) नाबाद 88 चेंडूत आक्रमक खेळी खेळून शतक झळकावलं. कौरनं 88 चेंडूत नाबाद 103 धावांची खेळी खेळली. या खेळीत तिनं 9 चौकारांसह 3 उत्तुंग षटकार ठोकले. यादरम्यान तिचा स्ट्राईक रेट 117.05 राहिला. पहिल्या एकदिवसीय सामन्यात कौरची फलंदाजी फ्लाॅप गेली होती. परंतु दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात तिनं शानदार कमबॅक केला.
दक्षिण आफ्रिकेसाठी गोलंदाजी करताना नॉनकुलुलेको मलाबानं 2 तर मसाबता क्लासनं 1 विकेट घेतली आणि दुसरी कोणतीही गोलंदाज यशस्वी झाली नाही.
पहिल्याच एकदिवसीय सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय मिळवला होता. भारतानं दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पहिला एकदिवसीय सामना 143 धावांनी जिंकला होता. आता दुसऱ्या सामन्यात कर्णधार हरमनप्रीत कौर आणि उपकर्णधार स्मृती मानधना यांच्या शतकी खेळीच्या जोरावर भारतानं दक्षिण आफ्रिकेसमोर 326 धावांचं आव्हान ठेवलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
विराट कोहलीच्या फाॅर्मबद्दल भारताच्या माजी खेळाडूचं वक्तव्य! दिलं रोहितचं उदाहरण
सूर्यकुमार यादव इतिहास रचण्याच्या जवळ, असं करताच मोडेल धोनी अन् कार्तिकचा विक्रम
मार्कस स्टॉइनिस टी20 अष्टपैलू रँकिंगमध्ये अव्वल स्थानी, आश्चर्यकारक! टाॅप-5 मध्ये एकही भारतीय नाही