भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघ शनिवारी (30 डिसेंबर) आमने सामने होते. उभय संघांतील वनडे मालिकेचा हा दुसरा सामना होता. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हा सामना रंगला असून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 8 विकेट्सच्या नुकसानावर 258 धावांपर्यंत जमल मारली. यात सलामीवीर फिबी लिछफिल्ड आणि तिसऱ्या क्रमांकावर खेळणारी एलिस पेरी यांनी अर्धशतकी खेळी केली. तर दुसरीकडे भारतासाठी दीप्ती शर्मा हिने विकेट्सचे पंचक नावावर केले.
Innings Break!
Australia post 258/8 in the first innings.@Deepti_Sharma06 stars with a FIFER for #TeamIndia 👏👏
Over to our batters 💪
Scorecard ▶️ https://t.co/yDjyu27FoW#INDvAUS | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/4gbRMVHore
— BCCI Women (@BCCIWomen) December 30, 2023
ऑस्ट्रेलियाने या सामन्याची नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर फिबी लिचफिल्ड हिने 98 चेंडूत 63 धावांची सर्वोत्तम खेळी केली. पण सलामीला आलेली कर्णधार एलिसा हिली याही सामन्यात स्वतःत बाद झाली. एलिसाने 13 धावा केल्यानंतर पूजा वस्त्राकर हिने तिचा त्रिफळा उडवला. तिसऱ्या क्रमांकावर आलेली एलिस पेरी हिने 47 चेंडूत 50 धावा केल्या. दीप्ती शर्माच्या चेंडूवर तिने श्रेयांका पाटीलच्या हातात झेल दिला आणि विकेट गमावली. बेथ मुनी 10, ताहलिया मॅकग्रा 24, एशले गार्डनर 2, एनाबेल सदरलँड 23 आणि जॉर्जिया वेयरहम 22 धावा करून बाद झाल्या. अलाना किंग 28*, तर किम गार्थ 11* धावांसह नाबाद राहिल्या.
दुसरीकडे भारतासाठी दीप्ती शर्मा पुन्हा एकदा चमकदार कामगिरी करू शकली. दीप्तीने टाकलेल्या 10 षटकांमध्ये 38 धावा खर्च केल्यानंतर 5 विकेट्स घेतल्या. स्नेह राणा, श्रेयांका पाटील आणि पूजा वस्त्राकर यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.
(INDWvsAUSW 2nd ODI Australia post 258/8 in the first innings)
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
भारत – स्मृती मंधाना, यास्तिका भाटिया, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), दीप्ती शर्मा, ऋचा घोष (यष्टीरक्षक), श्रेयंका पाटील, स्नेह राणा, अमनजोत कौर, रेणुका ठाकूर सिंग, पूजा वस्त्राकर.
ऑस्ट्रेलिया – एलिसा हिली, फिबी लिचफिल्ड, एलिस पेरी, बेथ मूनी, थासला मॅकग्रा, एशले गार्डनर, एनाबेल सदरलँड, जाॅर्जिया वेयरहम, अलाना किंग, किम गार्थ, डार्सी ब्राऊन
महत्वाच्या बातम्या –
रोहित-रितिकाने मुलगी समायराचा वाढदिवस साजरा केला हटके अंदाजात; दिलं मोठं सरप्राईज, पाहा व्हिडिओ
दुसऱ्या वनडे सामन्यात नाणेफेक जिंकूण ऑस्ट्रेलियाने घेतला प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय, भारतीय संघात ‘हे’ दोन महत्वपूर्ण बदल