---Advertisement---

VIDEO: फिल्डिंग असावी तर मॅक्सवेलसारखी! हवेत असा झेपावला की पाहात रहाल

On: मंगळवार, सप्टेंबर 20, 2022 11:21 PM
glen maxwell
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला टी-20 सामना मंगळवारी (20 सप्टेंबर) मोहालीमध्ये खेळला गेला. उभय संघातील ही टी-20 मालिका तीन सामन्यांची असून पहिल्या सामन्यात भारतीय फलंदाजांना धमाकेदार प्रदर्शन केले. हार्दिक पंड्याच्या वादळी खेळीच्या जोरावर भारताने या सामन्यात 6 विकेट्सच्या नुकसानावर 208 धावा केल्या. असे असले तरी, भारत फलंदाजी करत असताना 19 व्या षटकात ऑस्ट्रेलियन दिग्गज ग्लेन मॅक्सवेल याने स्वतःच्या संघासाठी उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचा नमुना सादर केला. 

भारतीय संगाचा अष्टपैलू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याने या सामन्यात 30 चेंडूत नाबाद 71 धावांची खेळी केली. त्याच्या साधीला वेगवान गोलंदाज हर्षल पटेल शेवटपर्यंत खेळपट्टीवर टिकून राहिला. हर्षलने 4 चेंडूत नाबाद 7 धावांचे योगदान दिले. भारताच्या डावातील 19 व्या षटकात ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज नाथन एलिस गोलंदाजीसाठी आला होता. त्याच्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर हर्षल स्ट्राईकवर होता आणि त्याने षटकरासाठी एक मोठा शॉट खेळला.

हर्षलने मारलेला चेंडू सीमारेषेपार जाणारच होता, पण तितक्यात ग्लेन मॅक्सवेल (Glen Maxwell) याने एक उंच उडी मारून चेंडू अडवला. मॅक्सवेल सीमारेषेच्या जवळ क्षेत्ररक्षणासाठी उभा होता, पण कुणालाच वाटले नव्हते की, तो हा षटकार रोखू शकेल. चेंडू सीमारेषेपार गेलाच होता, असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. कारण मॅक्सवेलचा हात जेव्हा चेंडूला लागला, तेव्हा तो पूर्णपणे हवेत होता. त्याने चेंडू अडवून सीमारेषेच्या आतमध्ये फेकला आणि तो स्वतः मात्र मैदानाबाहेर जाऊन पडला. त्याने मैदानात दाखवलेल्या चपळाईमुळे ऑस्ट्रेलियन संघाच्या 5 धावा वाचल्या.

मॅक्सवेलने संघासाठी वाचवलेल्या या धावा शेवटी त्यांना मिळालेल्या विजयात देखील कामी आल्या, असे म्हणता येईल. भारताने प्रथम फलंदाजी करताना मोठे आव्हान उभे केले असले, तरी प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघाने देखील तितक्याच ताकतीने फलंदाजी केली. सामना शेवटच्या षटकापर्यंत चालला. शेवटच्या षटकात ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 2 धावांची आवश्यकता होती. या षटकातील पहिल्या चेंडूवर युझवेंद्र चहलाने टिम डेविडची विकेट घेतली. पण दुसऱ्या चेंडूवर पॅट कमिन्सने चौकार माकून सामना नावावर केला.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –  

ऑस्ट्रेलियाच टी20 चे किंग! 209 धावांचा पाठलाग करत चारली टीम इंडियाला धूळ; ग्रीन-वेड विजयाचे शिल्पकार
रोहित-विराटकडून पुन्हा निराशा! संघाला संकटात टाकून परतले तंबूत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---