इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)मध्ये एकाहून एक दमदार खेळाडूंची भरणा आहे. अशाच दमदार खेळाडूंच्या गर्दीत नव्या खेळाडूंना त्यांची ओळख निर्माण करण्यासाठी काही-ना-काही कारनामा करावा लागतो. जेणेकरुन संघात त्यांचे स्थानही टिकून राहते आणि त्यांना नवी ओळखदेखील मिळते.
गतवर्षी आयपीएलच्या १२व्या हंगामात अशाच एका शानदार युवा खेळाडूने एंट्री केली. त्याने येताच पदार्पणाच्या सामन्यात अर्धशतक ठोकत एक दमदार विक्रम आपल्या नावावर केला आणि आयपीएलमधील स्टार खेळाडूंमध्ये आपल्या नावाची नोंद केली. हा खेळाडू म्हणजे, आसामचा १८ वर्षीय ‘रियान पराग’ होय.
१० नोव्हेंबर २००१मध्ये आसामच्या गुवाहाटी येथे जन्मलेला रियान हा माजी क्रिकेटपटू पराग दास यांचा मुलगा आहे. दास हे आसाम क्रिकेट संघाचे खतरनाक अष्टपैलू क्रिकेटपटू होते. त्यांनी आपल्या १४ वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत ४३ प्रथम श्रेणी सामन्यात १९३६ धावा आणि ३६ विकेट्स आपल्या नावावर नोंदवल्या होत्या. तर ३२ अ दर्जाचे सामन्यात ५७५ धावा आणि १७ विकेट्सची कामगिरी केली होती.
दास यांनी स्वत: आपला मुलगा रियानला क्रिकेटचे प्रशिक्षण दिले होते. तर रियानची आई मिठ्ठू बरुवा या स्विमिंग चॅम्पियन होत्या. त्यांनी ५० मीटर फ्रीस्टाइल स्विमिंगमध्ये भारताचे प्रतिनिधित्त्व केले होते. तर त्यांनी आशियाई चॅम्पियनशीपमध्येही भाग घेतला होता. अशा क्रिडापटूंच्या घरात जन्मलेला रियान हा एक प्रतिभावान खेळाडू आहे. क्रिकेटव्यतिरिक्त त्याला वेटलिफ्टिंगचीही खूप आवड आहे.
रियानने २०१७ साली देशांतर्गत क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती. तो वडिल दास यांच्याप्रमाणे फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीतही माहीर आहे. रियानने आजवर देशांतर्गत क्रिकेटमध्ये १३ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेl. त्यात त्याने एक शतक आणि ४ अर्धशतक ठोकत ६५९ धावा केल्या होत्या. सोबतच १४ विकेट्सही घेतल्या होत्या.
तर, मर्यादित षटकांच्या ‘अ’ दर्जाच्या क्रिकेटमध्ये त्याने २४ सामन्यात ५४१ धावा आणि २२ विकेट्सची कामगिरी केली आहे. तर देशांतर्गत पातळीवरील टी२० क्रिकेटमध्ये त्याने २४ सामन्यात ४७० धावा आणि ११ विकेट्सची नोंद आपल्या नावावर केली आहे.
क्रिकेटच्या तिन्ही स्वरुपात दमदार कामगिरी करणाऱ्या रियागला वयाच्या १८व्या वर्षी म्हणजे आयपीएल २०१९मध्ये राजस्थान रॉयल्सने २० लाख रुपयांना विकत घेतले होते. तरीही त्याने पदार्पणाच्या हंगामात कहर केला होता. रियानने पूर्ण हंगामात ७ सामने खेळले होते. त्यातील ५ डावात त्याने फलंदाजी करताना १२६.९८च्या स्ट्राईक रेटने १६० धावा केल्या होत्या.
यात त्याच्या दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या ताबडतोब अर्धशतकी खेळीचा समावेश होता. त्या सामन्यात रियानने ४९ चेंडूत ५० धावांची दमदार खेळी केली होती. यात त्याच्या ४ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. यासह त्याने आयपीएल इतिहासात सर्वात कमी वयात अर्धशतक ठोकण्याचा विक्रम आपल्या नावावर केला होता.
बेन स्टोक्स, स्टिव्ह स्मिथ अशा अनुभवी खेळाडूंसोबत रियानने वेळ घालवला आहे. त्यांच्याकडून रियानने फलंदाजीचे काही टिप्सदेखील घेतले होते. हा धाकड खेळाडू यावर्षीही स्टिव्ह स्मिथच्या नेतृत्त्वाखालील राजस्थान रॉयल्स संघाचा भाग आहे. १९ सप्टेंबरपासून युएईच्या मैदानावर तो गतवर्षीपेक्षाही दमदार प्रदर्शन करताना दिसू शकतो.
ट्रेंडिंग लेख-
आयपीएल २०२० मध्ये अशा असू शकतात सर्व संघांच्या सलामी जोड्या, ज्या ठरु शकतात सुपर हिट
या ३ आयपीएल संघात आहेत दर्जेदार फिरकीपटू, जे गाजवतील यूएईतील मैदानं
…आणि वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी रांचीच्या त्या खेळाडूने केली क्रिकेट खेळायला सुरुवात
महत्त्वाच्या बातम्या –
सचिन तेंडुलकरने शेअर केला व्हिडीओ; म्हणाला, माझा नवीन मित्र परत आला आहे
एबी डिविलिअर्सला ‘या’ फलंदाजामध्ये दिसते स्वतःचीच झलक
ऑस्ट्रेलिया-इंग्लंड संघातील ‘करो या मरो’च्या सामन्यात ‘या’ खेळाडूचे होणार पुनरागमन