fbpx
Thursday, January 28, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आयपीएल २०२० मध्ये अशा असू शकतात सर्व संघांच्या सलामी जोड्या, ज्या ठरु शकतात सुपर हिट

/there may be something ike opening pair of all teams in ipl 2020

September 16, 2020
in टॉप बातम्या, क्रिकेट
0
Photo Courtesy: Twitter/IPL

Photo Courtesy: Twitter/IPL


आयपीएलचा १३ वा हंगाम युएईमध्ये १९ सप्टेंबरपासून सुरू होईल. क्रिकेट चाहते या हंगामाची आतुरतेने वाट पाहात आहेत.

या हंगामासाठी सर्वच संघांनी शानदार तयारी केली आहे. प्रत्येक संघ आयपीएलचा हा हंगाम सुरु होण्याआधी संतुलित दिसून येत आहे. प्रत्येक संघांकडेही चांगले सलामीवीर आहेत. या खास लेखात आयपीएल २०२० मध्ये सर्व संघांच्या सलामीच्या जोड्यांबद्दल जाणून घेऊ, ज्या सलामीच्या जोड्या सातत्याने त्या संघाला चांगली सुरुवात करुन देऊ शकतात.

पृथ्वी शॉ-शिखर धवन – दिल्ली कॅपिटल्स

दिल्ली कॅपिटल्सचा आयपीएल इतिहास काही खास नाही. या संघाने एकदाही आयपीएलची अंतिम फेरी गाठली नाही. पण दिल्ली कॅपिटल संघ आयपीएल २०२० मध्ये चमकदार कामगिरी करू शकतो. या हंगामात त्यांची सलामीची जोडीही चांगली दिसत आहे. शिखर धवन आणि पृथ्वी शॉ या हंगामात संघासाठी सलामीची जबाबदारी स्वकारतील. मागील हंगामातही या दोन्ही सलामीवीरांनी दिल्लीला बर्‍याच सामन्यांमध्ये चांगली सुरुवात दिली होती.

या दोन सलामीवीरांव्यतिरिक्त अजिंक्य रहाणे हा देखील पर्यायी सलामी फलंदाज दिल्लीमध्ये आहेत. परंतु संघ व्यवस्थापन धवन-पृथ्वी या जोडीने आपली मोहीम सुरू करू शकतील.

शेन वॉटसन-फाफ डू प्लेसी – चेन्नई सुपर किंग्ज

आयपीएलच्या इतिहासात सर्वात सातत्यपूर्ण कामगिरी करणारा चेन्नई सुपर किंग्ज संघही या आयपीएल हंगामात बलाढ्य संघ दिसत आहे. सर्व क्षेत्रात चेन्नई सुपर किंग्ज संघ संतुलित असल्याचे दिसून येत आहे.

या संघात सलामीची जोडी म्हणून शेन वॉटसन आणि फाफ डु प्लेसीसारखे अनुभवी खेळाडू आहेत. या दोन्ही सलामीवीर फलंदाजांनी यापूर्वी चेन्नई सुपर किंग्जकडून बर्‍यापैकी धावा केल्या आहेत आणि या हंगामातही त्यांच्याकडून तिच अपेक्षा असेल. तसेच मुरली विजय आणि ऋतुराज गायकवाड हे देखील संघात सलामीचे पर्याय म्हणून चेन्नई संघात उपस्थित आहेत.

ख्रिस गेल-केएल राहुल – किंग्ज इलेव्हन पंजाब

किंग्ज इलेव्हन पंजाब संघ आयपीएलमधील पहिला विजेतेपद मिळवण्याच्या हेतूने मैदानात उतरेल. या संघाची सलामीची जोडी जबरदस्त शक्तिशाली आहे. त्यांच्याकडे सलामीला फलंदाजी करण्यासाठी केएल राहुल आणि ख्रिस गेलसारखे २ स्फोटक फलंदाज आहेत.

हे दोन्ही सलामीवीर फलंदाज गेली दोन वर्षे पंजाब संघासाठी चांगली कामगिरी करत आहेत आणि यावेळीसुद्धा ही जबाबदारी त्यांच्यावर असेल. परंतु या संघाची मधली फळी पुरेशी मजबूत नसल्यामुळे हा संघ संघर्ष करीत असल्याचे दिसत आहे.

जॉनी बेअरस्टो-डेव्हिड वॉर्नर – सनरायझर्स हैदराबाद

आयपीएल २०२० च्या सर्वात धोकादायक सलामीच्या जोड्यांपैकी एक जोडी म्हणजे जॉनी बेअरस्टो आणि डेव्हिड वॉर्नर ही असेल.
या दोन्ही फलंदाजांनी सनरायझर्स हैदराबादला गेल्या वर्षीच्या बऱ्याच सामन्यांमध्ये शानदार फलंदाजीने एकतर्फी विजय मिळवून दिला होता.

या दोन्ही फलंदाजांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीचा अनुभवही आहे, त्यामुळे ही जोडीही आयपीएल २०२० ची सर्वोत्कृष्ट जोडी असल्याचे सिद्ध होऊ शकते.

रोहित शर्मा-क्विंटन डी कॉक – मुंबई इंडियन्स

आतापर्यंतच्या आयपीएलच्या इतिहासात मुंबई इंडियन्स संघाने चार वेळा विजेतेपद मिळविले आहे. मुंबई इंडियन्सच्या यशाचे सर्वात मोठे रहस्य म्हणजे त्यांच्या संघाचे चांगले संयोजन, जे यावर्षी देखील दिसून येईल. प्रत्येक विभागात मुंबई इंडियन्स संघ मजबूत आहे.
या संघाची सलामी जोडी चांगली आहे, कारण आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे २ उत्कृष्ट सलामीवीर या संघासाठी सलामीला खेळताना दिसू शकणार आहेत. सलामीला एका बाजुने संघाचा कर्णधार स्वतः रोहित शर्मा असेल. तर दुसरीकडे दक्षिण आफ्रिका संघाचा टी-२० कर्णधार क्विंटन डी कॉक असेल. या दोघांच्या उपस्थितीत मुंबई इंडियन्सची सलामीची बाजू जोरदार दिसत आहे.

सुनील नारायण-शुभमन गिल – कोलकाता नाइट रायडर्स

२ वेळा आयपीएल चषक जिंकणारा कोलकाता नाईट रायडर्स संघ गेल्या वर्षी काही खास कामगिरी करू शकला नाही. त्यांच्या कामगिरीत सातत्य नव्हते. पण यंदा देखील ते मागील काही वर्षांप्रमाणेच सुनील नारायणला सलामीला पाठवू शकतात. तो स्फोटक फलंदाजी करतो. त्याला साथ देण्यासाठी शुबमन गिल येऊ शकतो. कारण यावेळी ख्रिस लीन संघात नसल्याने गिलवर सलामीची जबाबदारी सोपवली जाऊ शकते.

ऍरॉन फिंच-पार्थिव पटेल -रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर

आयपीएल २०२० मध्ये ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आणि सलामीवीर फलंदाज ऍरॉन फिंच आरसीबी संघासाठी सलामीला फलंदाजी करताना दिसू शकतो. त्याच्यासोबत सलामीला भारतीय फलंदाज पार्थिव पटेल येऊ शकतो.

या दोघांच्याही खांद्यावर चांगली सुरुवात करण्याची जबाबदारी असेल, कारण जर या दोन्ही फलंदाजांनी आरसीबीला चांगली सुरुवात दिली तर विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स त्याचा चांगला फायदा घेऊ शकतात आणि संघाला मोठी धावसंख्या उभारुन देण्यास मदत करु शकतात.

यशस्वी जयस्वाल-जोस बटलर – राजस्थान रॉयल्स

यशस्वी जयस्वालने १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक २०२० स्पर्धेच्या ६ सामन्यात १३३.३ च्या सरासरीने एकूण ४०० धावा केल्या होत्या. यात त्याचा स्ट्राइक रेट ८२.४७ असा होता. या स्पर्धेत त्याने एकूण ४ अर्धशतक आणि १ शतक झळकावले होते. विजय हजारे वनडे स्पर्धेत त्याने दुहेरी शतकही केले आहे. त्याची ही कामगिरी पाहता त्याला अंतिम ११ जणांच्या संघात स्थान तर दिले जाऊ शकतेच पण त्याचबरोबर तो जोस बटलरबरोबर सलामीला जाताना दिसू शकतो.

यशस्वी जयस्वाल आणि जोस बटलरची सलामीची जोडी आयपीएलमधून मैदानात उतरण्याची ही पहिली वेळ असेल. ही जोडी इतर संघांसाठीही धोकादायक असल्याचे सिद्ध होऊ शकते.


Previous Post

या ३ आयपीएल संघात आहेत दर्जेदार फिरकीपटू, जे गाजवतील यूएईतील मैदानं

Next Post

भारताबरोबर मालिका न झाल्याने पाकिस्तानचे झाले तब्बल एवढ्या कोटींचे नुकसान

Related Posts

Photo Courtesy: Twitter/ ICC
टॉप बातम्या

कचरा वेचणारा मुलगा ते ‘युनिव्हर्स बॉस’

January 28, 2021
Photo Courtesy: Twitter/@KKRiders
टॉप बातम्या

मुंबई टू टीम इंडिया व्हाया केरळ! भारतीय संघात नेट बॉलर म्हणून निवड झालेल्या संदीप वॉरियरचा संघर्षमय प्रवास

January 27, 2021
Screengrab: Instagram/@radhika_dhopavakar
टॉप बातम्या

क्वारंटाईनमध्ये रहाणे घालवतोय मुलीसोबत वेळ, पत्नीने शेअर केला गोड व्हिडिओ

January 27, 2021
Photo Courtesy: Twitter/@JamshedpurFC
टॉप बातम्या

आयएसएल २०२०-२१ : ब्लास्टर्सची जमशेदपूरची गोलशून्य बरोबरी

January 27, 2021
Photo Courtesy: Twitter/@englandcricket
टॉप बातम्या

वनक्कम टीम इंग्लंड! जो रूटचा संघ पोहोचला चेन्नईत

January 27, 2021
Photo Courtesy: Twitter/@TheRealPCB
टॉप बातम्या

कराची कसोटीत पाकिस्तानला आघाडी, फवाद आलमचे संघर्षपूर्ण शतक

January 27, 2021
Next Post
Photo Courtesy: Twitter/ ICC

भारताबरोबर मालिका न झाल्याने पाकिस्तानचे झाले तब्बल एवढ्या कोटींचे नुकसान

Photo Courtesy: Twitter/ ICC

आयपीएलची तयारी पाहून सौरव गांगुली खूश; चक्क स्टेडियमवर जाऊन...

Photo Courtesy: Twitter/ IPL

मुंबई इंडियन्स सोडून इतर सात आयपीएल संघांना बसणार 'हा' मोठा झटका

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.