---Advertisement---

इंग्लंड दौऱ्याआधी भारतीय संघाला मोठा धक्का; हा मोठा खेळाडू पडला मर्यादीत षटकांच्या मालिकेतून बाहेर

On: शनिवार, जून 30, 2018 7:52 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा इंग्लंड दौरा 3 जुलै पासून सुरु होणार आहे. पण त्याआधीच भारताला मोठा धक्का बसला आहे. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह बोटाला झालेल्या फ्रॅक्चरमुळे इंग्लंड दौऱ्यातील वनडे आणि टी20 मालिकेला मुकणार आहे.

त्याला आयर्लंड विरुद्ध 27 जूनला झालेल्या पहिल्या टी20 सामन्यादरम्यान ही दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला 29 जूनला झालेल्या दुसऱ्या टी20 सामन्यालाही मुकावे लागले होते.

या दुखापतीमुळे आता तो परत भारतात परतणार आहे. भारतीय संघासाठी हा मोठा धक्का आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेतही चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे भारतीय संघ तो 1 आॅगस्टपासून सुरु होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी बरा होण्याची आशा बाळगुन आहे.

त्याचा बदली खेळाडू म्हणून शार्दुल ठाकूर किंवा दिपक चहरला संधी मिळण्याची शक्यता आहे. या दोघांनीही यावर्षीच्या आयपीेएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना चांगली कामगिरी केली होती. तसेच हे दोघेही सध्या इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारत अ संघाकडून खेळत आहेत.

भारतीय संघ 3 जुलैपासुन सुरु होणाऱ्या इंग्लंड दौऱ्यात 3 टी20, 3 वनडे आणि 5 कसोटी सामने खेळणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

आयर्लंडचे प्रतिनिधित्व केलेल्या या भारतीय खेळाडूने असा केला होता संघर्ष

आयसीसी टी20 क्रमवारीत भारताचे स्थान वधारले; आॅस्ट्रेलियाला टाकले मागे

Video: एमएस धोनीच्या चिमुकलीचा हार्दिक पंड्याला जोरदार पाठिंबा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment