---Advertisement---

आयपीएल इतिहासात रोहितने पार केला 6000 धावांचा टप्पा, पण ‘या’ बाबतीत शेवटून पहिलाच

Rohit-Sharma
---Advertisement---

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा सध्या इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघाचे नेतृत्व करत आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबईने स्पर्धेतील 25वा सामना सनरायझर्स हैदराबादविरुद्ध खेळला. या सामन्यात रोहितने एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली. अशी कामगिरी करणारा रोहित आयपीएल इतिहासातील चौथाच खेळाडू ठरला. मात्र, त्याला ही कामगिरी करण्यासाठी सर्वाधिक डाव खेळावे लागले. त्याचबाबत आपण जाणून घेऊयात.

झाले असे की, सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघाचा कर्णधार एडेन मार्करम (Aiden Markram) याने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. तसेच, मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाला फलंदाजीसाठी पाचारण केले होते. यावेळी मुंबईकडून कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि ईशान किशन यांनी डावाची सुरुवात केली. रोहित आणि ईशानने यावेळी संघाला चांगली सुरुवात करून दिली. मात्र, रोहित फार काळ मैदानावर टिकू शकला नाही. यादरम्यान त्याने 14 धावा करताच त्याच्या नावावर खास विक्रम नोंदवला गेला. रोहितने या सामन्यात एकूण 18 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीने 28 धावा केल्या.

रोहितने 14 धावा करताच त्याच्या आयपीएलमधील 6000 धावा पूर्ण झाल्या. अशी कामगिरी करणारा रोहित चौथा खेळाडू ठरला. विशेष म्हणजे, त्याला या धावा करण्यासाठी 227 डाव खेळावे लागले. आयपीएलमध्ये रोहितच्या नावावर 6014 धावा झाल्या आहेत. आयपीएलमध्ये 6000 धावां करण्यासाठी सर्वात कमी डाव खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये अव्वलस्थानी डेविड वॉर्नर (David Warner) आहे. त्याने 165 डावांमध्येच हा कीर्तिमान रचला होता. आयपीएलमध्ये वॉर्नरच्या नावावर 6109 धावा आहेत.

याव्यतिरिक्त दुसऱ्या स्थानी विराट कोहली (Virat Kohli) असून त्याने 188 डावांमध्ये 6000 धावांचा टप्पा गाठला होता. विराटच्या नावावर आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा असून त्याने आतापर्यंत 6844 धावा केल्या आहेत. याव्यतिरिक्त तिसऱ्या स्थानी शिखर धवन (Shikhar Dhawan) असून त्याने 199 डावांमध्ये 6000 धावा केल्या होत्या. विशेष म्हणजे, आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत धवन दुसऱ्या स्थानी असून त्याच्या नावावर 6477 धावा आहेत. (Innings taken to reach 6000 IPL runs see list)

आयपीएलमध्ये 6000 धावांचा टप्पा गाठण्यासाठी खेळावे लागलेले डाव
165- डेविड वॉर्नर
188- विराट कोहली
199- शिखर धवन
227- रोहित शर्मा*

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पदार्पण अर्जुनचे, पण मैफील लुटली वडील सचिन तेंडुलकरने, ‘दादा’ अन् बच्चनला रिप्लाय देत म्हणाला…
जेवणासाठी तिलक वर्माच्या घरी पोहोचला मुंबईचा आख्खा संघ! स्वतः सचिननही होता उपस्थित

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---