सध्या क्रिकेट जगतात अनेक युवा खेळाडू प्रवेश करत आहेत. हे खेळाडू अनेक मोठमोठ्या खेळाडूंना आपले आदर्श मानतात. आणि जेव्हा क्रिकेटच्या मैदानात किंवा मैदानाबाहेर ते आपल्या आवडत्या खेळाडूला भेटतात तेव्हा त्यांचा आनंद गगणात मावेनासा असतो. असंच काहीसं झालंय झिम्बाब्वेचा सलामीवीर फलंदाज इनोसेंट काईया याच्यासोबत.
Innocent Kaia with his favourite cricketer KL Rahul 😍
📷: FanCode/Twitter#KLRahul #InnocentKaia #CricketTwitter pic.twitter.com/9Mwng9cve2
— CricTracker (@Cricketracker) August 21, 2022
काईया हा भारताचा सलामीवीर फलंदाज आणि झिम्बाब्वे दौऱ्यातील कर्णधार केएल राहुल याचा जबरा फॅन आहे. याआधी काईयाने शतक झळकावल्यानंतर केएल राहुलच्या सेलिब्रेशनची नक्कल करत त्याचा दाखला दिला आहे. यावेळी सुरू असलेल्या भारत-झिम्बाब्वे दौऱ्यातील सामन्यानंतर काईया याने केएल राहुलची भेट घेतली. या भेटीदरम्यानचा फोटो सध्या व्हायरल होत आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘हे सर्व क्रिकेट बोर्डावर अवलंबून आहे’, कर्णधारपदावरील बंदीबाबत वॉर्नरची हताश प्रतिक्रिया
आशिया चषकातून बाहेर झालेला आफ्रिदी कधी करणार पुनरागमन? जास्त दूर नाही तो दिवस