सिनेगृहात सिनेमा पाहायला कुणाला आवडत नाहीत, अर्थातच सर्वांना आवडते. तरीही, असे म्हटलं की, सिनेगृहात क्रिकेटचे सामनेही पाहायला मिळू शकतात, तर कदाचित अनेकांचा विश्वास बसणार नाही. मात्र, हे खरं आहे. आगामी टी20 विश्वचषकाचे सामने थेट सिनेगृहात बसून पाहता येणार आहेत. टी20 विश्वचषक 2022ची सुरुवात 16 ऑक्टोबरपासून होणार आहे. यातील भारताचा पहिला सामना 23 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्ध खेळला जाणार आहे. यासाठी प्रत्येकजण नवीन टीव्ही विकत घेत आहे, तर अनेकजण मोठ्या पडद्यावर हा सामना पाहण्याची तयारी करत आहे. अशात मूव्ही थिएटर कंपनी INOX ने मोठी घोषणा केली आहे.
माध्यमांतील वृत्तांनुसार, आयनॉक्स (INOX) टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) या स्पर्धेतील सर्व सामने आपल्या सिनेगृहात लाईव्ह टेलिकास्ट करणार आहे.
तब्बल 25हून अधिक शहरांमध्ये होणार लाईव्ह टेलिकास्ट
हाती आलेल्या वृत्तानुसार, आयनॉक्स देशाच्या 25 शहरांमध्ये टी20 विश्वचषकातील भारताचे सर्व सामन्यांचे लाईव्ह प्रक्षेपण करणार आहे. आयनॉक्सने यासंबंधी आयसीसीसोबत एक करार केला आहे. यामध्ये 23 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) सामन्यापासून ते उपांत्य आणि अंतिम सामन्याच्या प्रक्षेपणाचाही समावेश आहे. आयनॉक्सकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनानुसार, “टी20 विश्वचषकात भारताचे सर्व सामन्यांचे लाईव्ह प्रक्षेपण 25हून अधिक शहरांमध्ये आयनॉक्स मल्टीप्लेक्समध्ये दाखवले जाईल.”
आयनॉक्समध्ये 1.57 लाख बैठक क्षमता
आयनॉक्सच्या एका अधिकाऱ्याने म्हटले की, “सिनेगृहात क्रिकेटची स्क्रीनिंग करून आम्ही आपल्या देशातील सर्वात आवडत्या खेळाला म्हणजेच क्रिकेटसोबत मोठा स्क्रीन अनुभव आणि गरजणाऱ्या आवाजाचा रोमांच एकत्र आणत आहोत. विश्वचषकाचा उत्साह आणि भावना यामध्ये भर पाडतील. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांसाठी एक आभासी मेजवानी मिळेल.” विशेष म्हणजे, आयनॉक्स 165 मल्टीप्लेक्स 705 स्क्रीनसोबत 74 शहरांमध्ये काम करते. तसेच, संपूर्ण भारतात याची एकूण बैठक क्षमता 1.57 लाख इतकी आहे.
येत्या 16 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या टी20 विश्वचषकाचे क्वालिफाय सामने खेळले जातील. तसेच, 22 ऑक्टोबरपासून सुपर 12 फेरी सुरू होईल. यातील पहिला सामना ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये खेळला जाईल. स्पर्धेचा अंतिम सामना 13 नोव्हेंबर रोजी मेलबर्न येथे खेळला जाईल.
टी20 विश्वचषक 2022मधील भारताचे सामने
23 ऑक्टोबर- भारत विरुद्ध पाकिस्तान, दुपारी- 1.30 वाजता (मेलबर्न)
27 ऑक्टोबर- भारत विरुद्ध ग्रूप ए रनर-अप, दुपारी- 12.30 वाजता (सिडनी)
30 ऑक्टोबर- भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, सायंकाळी- 4.30 वाजता (पर्थ)
2 नोव्हेंबर- भारत विरुद्ध बांगलादेश, दुपारी- 1.30 वाजता (ऍडलेड)
6 नोव्हेंबर- भारत विरुद्ध ग्रूप बी विनर, दुपारी- 1.30 वाजता (मेलबर्न)
टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, रिषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, आर अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.
राखीव खेळाडू
मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, दीपक चाहर.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
चालू सामन्यात ज्युनिअरच्या अंगावर धावून गेला अंबाती रायुडू, पंचांनाही खटकलं कृत्य
‘ते दोघं वनडेत पंतची जागा घेऊ शकत नाहीत’, भारतीय दिग्गजाने कुणाबद्दल केले मोठे वक्तव्य?