मुंबई। इंटरकॉन्टीनेंटल कप 2018 फूटबॉल स्पर्धेत 8 जूनला केनियाने तैवानचा 4-0 अशा फरकाने पराभव करत स्पर्धेची अंतिम फेरी दिमाखात गाठली. त्यामुळे आता अंतिम फेरीत केनियाचा सामना यजमान भारताविरुद्ध होणार आहे.
8 जूनला केनिया विरुद्ध तैवान सामन्यानंतर भारत, केनिया आणि न्यूझीलंडचे प्रत्येकी 6 गुण झाले होते. पण गोलच्या फरकामुळे भारत आणि केनियाने गुणतालिकेत अनुक्रमे पहिले आणि दुसरे स्थान पटकावले.
भारत, केनिया आणि न्यूझीलंडमध्ये अनुक्रमे +7,+2 आणि +1 असा गोलफरक आहे. या तीनही संघांना आत्तापर्यंत 2 विजय आणि 1 पराभव मिळाला आहे.
Kenya jumps into the second place in the points table to face India in the Finals of Hero Intercontinental Cup at the Mumbai Football Arena at 8 PM on Sunday.#WeAreIndia #BackTheBlue #AsianDream pic.twitter.com/jZKV7ibxuR
— Indian Football Team (@IndianFootball) June 8, 2018
तसेच तैवान या आधीच स्पर्धेतून बाहेर पडले होते. त्यांना तीनही सामन्यात पराभव स्विकारावा लागला आहे. त्याचबरोबर त्यांना या स्पर्धेत एकही गोल करता आलेला नाही.
भारताने या स्पर्धेत केनियाविरुद्ध 3-0, तैवान विरुद्ध 5-0 असा विजय मिळवला आहे, तर भारताला न्यूझीलंडने 1-2 असा पराभवाचा धक्का दिला होता.
याबरोबरत केनियाने न्यूझीलंडविरुद्ध 2-1, तैवान विरुद्ध 4-0 असा विजय मिळवला तर त्यांनी भारताविरुद्ध 0-3 असा पराभव पत्करला आहे.
भारत विरुद्ध केनिया अंतिम सामना रविवारी रात्री 8 वाजता सुरू होईल.
वाचा- मुंबई क्रिकेट सफरनामा भाग- १: मुंबईतील क्रिकेटचा इतिहास आणि मूलभूत जडणघडण