कोरोना व्हायरसने संपूर्ण जगभरात थैमान घातले आहे. या व्हायरसमुळे सर्व प्रकारच्या क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे जवळपास सर्वच खेळाडू आपापल्या घरांमध्ये वेळ घालवत आहेत.
परंतु अशामध्ये न्यूझीलंडचा माजी वेगवान गोलंदाज इयान ओ ब्रायन (Iain O’Brien) आपल्या मानसिक आजारावर उपचार करण्यासाठी न्यूझीलंडमध्ये आला होता. परंतु वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसला थांबविण्यासाठी अनेक देशांनी लॉकडाऊन बरोबरच (Lockdown) आंतरराष्ट्रीय सीमाही बंद केल्या आहेत. या कारणामुळे ब्रायनची फ्लाईट ३ वेळा रद्द झाली होती. त्यामुळे तो न्यूझीलंडमध्ये अडकला होता.
४३ वर्षीय इयान आपली पत्नी आणि २ मुलांसोबत ब्रिटनमध्ये (Britain) राहतो. ब्रिटनमध्ये असलेल्या आपल्या परिवाराकडे जाण्यासाठी त्याच्याकडे पुरेसे पैसे नव्हते. इयानची फ्लाईट ३ वेळा रद्द झाली होती. त्यामुळे त्याने लोकांकडे आपल्या तिकीटांसाठी (Ticket) आवश्यक रक्कम जमा करण्याचे आवाहन केले होते.
परंतु जेव्हा शुक्रवारी (२७ मार्च) सकाळी उठल्यावर त्याने पाहिले तर त्याच्याकडे ३६६० पाऊंड म्हणजेच जवळपास ३ लाख ४१ हजार इतकी रक्कम जमा झाली होती. त्याचे लक्ष्य २२५० पाऊंड रुपये जमा करण्याचे होते.
न्यूझीलंडच्या लोकांनी केलेल्या मदतीमुळे इयानला अश्रू अनावर झाले. तो एका भावूक व्हिडिओमध्ये म्हणाला की, “सकाळी झोपेतून उठल्यानंतर मी खूप रडलो. मी मदत करणाऱ्या सर्व व्यक्तींना धन्यवाद देतो. तसेच मी निशब्द आहे. यावेळी मी फक्त आभार व्यक्त करू शकतो.”
इयानने न्यूझीलंड संघाकडून २२ कसोटी, १० वनडे आणि ४ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत.यामध्ये त्याने कसोटीत ७३, वनडे १४ आणि टी२०त ६ विकेट्स घेतल्या आहेत.
ट्रेंडिंग घडामोडी-
-सर्वाधिक वनडे सामन्यांत एकदाही शुन्यावर बाद न होणारे ५ खेळाडू
-५ असे खेळाडू ज्यांच्या नावावर आहेत ५ विचित्र विक्रम
-१०० कसोटी खेळलेले परंतु १०० वनडेही खेळायला न मिळालेले ५ खेळाडू