पुणे – जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानावर असणारा प्रिन्स दहाल याचे आंतरराष्ट्रीय ग्रांप्री बॅडमिंटन स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. सुशांत चिपलकट्टी स्मृती म्हणून होणाऱ्या या स्पर्धेत नेपाळच्या प्रिन्सला अव्वल मानांकन होते. पात्रता फेरीतून आलेल्या भारताच्या अभिनव मंगलम याने त्याचा २५-२३, १४-२१, २२-२० असा पराभव केला. ही लढत ५५ मिनिटे चालली. हा स्पर्धेतील सर्वात सनसनाटी निकाल ठरला.
महाराष्ट्राच्या दर्शन पुजारी आणि तारा शहा यांनी उप-उपांत्यपूर्व फेरी गाठली. खेलो इंडिया स्पर्धेतील विजेता दर्शन याने समरवीरचे आव्हान २१-८, २२-२० असे परतवून लावले. सातव्या मानांकित तारा शहाने स्तुती अग्रवालचा प्रतिकार २१-१०, १७-२१, २१-६ असा मोडून काढला. ही लढत ४४ मिनिटे चालली. मुलींच्या गटातून बिगरमानांकित रुजुला रामू हिने खळबळजनक निकालाची नोंद केली. तिने मलेशियाच्या सहाव्या मानांकित सिती नुरसिंहानी हिचा २०-२२, २१-१९, २१-११ असा पराभव केला.
निकाल – मुले (एकेरी)
अभिनव मंगलम वि.वि. प्रिन्स दहल (१) (नेपाळ) 25-23, 14-21, 22-20;
तुषार सुवीर (११) वि.विअभिनव ठाकूर 21-18, 22-20;
रुशेंद्र तिरुपती वि.विआदिसाक प्रसेर्टफेटमानी (थायलंड) 23-21, 16-21, 21-18;
ध्रुव नेगी वि.वि कांग खाई झिंग (मलेशिया) 21-17, 21-13;
रेमस एनजी (सिंगापूर) वि.विलोकेश रेड्डी कलागोटला 21-14, 8-21, 21-15;
अनिशराज राजकुमार वि.वि हर्ष आनंद देशवाल 19-21, 21-17, 21-16;
प्रणय शेट्टीगर वि.वि रायन पुत्र विद्यांतो (इंडोनेशिया) 21-19, 21-23, 21-16;
नीर नेहवाल वि.वि तरुण बसवराज मोराब 21-11, 21-12
दर्शन पुजारी वि.वि समरवीर 21-8, 22-20;
मुहम्मद हलीम अस सिदीक ७(इंडोनेशिया) वि.वि प्रणव राम नागलिंगा 21-14, 21-14;
अभिषेक संतोषकुमार वि.वि 13 मो. नजमुल इस्लाम जॉय (बांगलादेश) 21-14, 8-21, 21-10
लक्ष्य शर्मा ४ वि.वि सात्विक रेड्डी कानापुरम 18-21, 21-15, 21-18;
वोंगसप वोंगसप-इन १० (थायलंड) वि.वि अंश विशाल गुप्ता 21-18, 17-21, 21-15
आयुष शेट्टी (८) वि.वि सिंग जसकरण 25-23, 21-14;
रौनक चौहान वि.वि जेसन होमर (श्रीलंका) 17-21, 21-19, 21-15
प्रणव राव गंधम (२) वि.वि संस्कार सारस्वत 21-16, 21-17
मुली – एकेरी
अनुपमा उपाध्याय १ वि.वि. पवित्रा नवीन 21-11, 21-11;
नेयसा करिअप्पा. ए वि.वि. जिया रावत 23-21, 23-21;
आकांशा मॅट वि.वि. शीना नरवाल 21-18, 21-7;
श्रेष्टा रेड्डी कन्नारेड्डी १५ वि.वि. रुत्वी बलोनी 21-13, 21-19;
इशाराणी बरुआ ४ वि.वि. रक्षा कंदसामी 21-11, 21-17;
सारुनराक विटिडसर्न ९ (थायलंड) वि.वि. ग्लोरिया व्ही आठवले 21-7, 21-15;
नव्या कंदेरी वि.वि. आलिशा नाईक 21-16, 21-16;
राधिका शर्मा वि.वि. रश्मिथा डोनेपुडी 21-15, 21-6;
तन्वी शर्मा वि.वि. प्रवीणा सुब्बुराज 21-16, 21-19;
रुजुला रामू वि.वि. सीती नुरशुहैनी ६ (मलेशिया) 20-22, 21-19, 21-11
नैशा कौर भतोये वि.वि. हिरल चौहान २१-१७, १४-२१, २१-१५;
उन्नती हुडा ३ वि.वि. तनिशा सिंग 21-11, 21-11;
अन्यापत फिचितप्रीचासक १२ (थायलंड) वि.वि. गार्गी गार्गी 21-8, 21-12;
तारा शाह ७ वि.वि. स्तुती अग्रवाल 21-10, 17-21, 21-6;
श्रीयांशी वालिशेट्टी वि.वि. 16-अजहरा मेलानी अर्जिसेत्या (इंडोनेशिया) 14-21, 22-20, 21-15;
चितवन खत्री वि.वि. नम्मी जान्हवी 21-12, 21-17
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
तर ‘हा’ आहे भारतीय संघातील सर्वात कंजूस खेळाडू, शिखर धवनचा मजेशीर खुलासा
सुपर-4मध्ये पोहोचल्यानंतर दुबईच्या बीचवर भारतीय संघाची मस्ती, विराटच्या सिक्स पॅक्सवर चाहते फिदा
टीम इंडियालाही बरोबरीची टक्कर देणाऱ्या हाँगकाँगला घाबरले पाकिस्तान! दिग्गजाने दिली वॉर्निंग






