आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या कार्यकारी मंडळाने २०३२ सालच्या ऑलिंपिक स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन शहराचा प्रस्ताव पुढे ठेवला आहे. याबाबत आज घोषणा करण्यात आली आहे.
फ्यूचर होस्ट कमिशनने केलेल्या शिफारशीनंतर पुढील निर्णय घेण्यात येईल. यासाठी आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समीतीचे सदस्य टोकियोमध्ये २१ जुलै रोजी मतदान करतील. टोकियोमध्ये २०२१ ऑलिंपिक खेळवण्यात येणार आहे.
The IOC Executive Board has decided to propose Brisbane 2032 to the IOC Session as host for the Games of the XXXV Olympiad.
The decision followed a recommendation by the Future Host Commission.
The IOC Members will vote at the 138th Session in Tokyo on 21 July.#IOCEB pic.twitter.com/17nAk1Ijqv
— IOC MEDIA (@iocmedia) June 10, 2021
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाच यांनी कार्यकारी मंडळाच्या बैठकीनंतर सांगितले की टोकियो ऑलिंपिकच्या उद्घाटनापूर्वी २१ जुलै रोजी होणाऱ्या बैठकीत ब्रिस्बेनला ऑलिंपिक २०३२ च्या आयोजनाचे अधिकार दिले जातील.
ब्रिस्बेन हे पहिलेच असे शहर असेल जे ऑलिंपिक आयोजक म्हणून नव्या प्रक्रियेअंतर्गत बिनविरोध निवडले जाईल, अशी सर्वांनाच अपेक्षा आहे. फेब्रुवारीमध्ये ब्रिस्बेनचे नाव आयोजनासाठी पसंतीचा उमेदवार म्हणून पुढे आले होते. ब्रिस्बेनच्या बोलीचे नेतृत्व ऑलिंपिक समीतीच्या उपाध्यक्ष जॉन कोट्स यांनी केले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
हे माहित आहे का? साउथॅम्टनमध्ये कसोटी शतक करणारा ‘हा’ आहे एकमेव भारतीय क्रिकेटपटू






