जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही असा जर, तुमच्यात मेहनत करण्याची ताकद असेल तर तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही. कित्येक क्षेत्रात आपण पाहत असतो की अमुक एका माणसाने मेहनतीच्या बळावर हे कमावलं ते कमावलं. त्यांचा यशाच्या शिखरावर पोचण्यात त्यांच्या आई-वडिलांचा आणि इतर लोकांचा खूप हातभार असतो. आज आपण अश्या व्यक्तीबद्दल चर्चा करणार आहोत ज्याने क्रिकेट विश्वात धुमाकूळ घातला. त्याची गोष्टसुद्धा अशीच काहीशी आहे. गरिबीतून आलेला तो फलंदाज आज जगतो आहे सर्वात भारी लाइफस्टाइल. चला तर मग जाणून घेऊया त्या वेस्ट इंडिअन फलंदाजाबद्दल.
ज्या फलंदाजांबद्दल आपण चर्चा करणार आहोत तो म्हणजे विस्फोटक फलंदाज ‘ख्रिस गेल’. जमैकामध्ये लहानाचा मोठा झालेला गेल अगदी गरीब घरण्यात जन्माला आला. गेल एका झोपडीत राहत असे आणि पैसे मिळवण्यासाठी रस्त्या वर साफसफाईसुद्धा करत असे. गेलची आई रस्त्यांना वर शेंगदाणे विकून मोल माजुरी करायची.
गेलने दहावीनंतर शिक्षण घेणे बंद केले. गेलकडे शाळेची फी भरण्या इतकेसुद्धा पैसे नसत. पैसे मिळवण्यासाठी रस्त्यावरचे प्लास्टिक कचरा यासारख्या गोष्टी उचलून पैसे कमवत असे. एका मुलाखतीदरम्यान, गेलने सांगितले की, ‘मी जर क्रिकेटर झालो नसतो तर आज पण मी त्याच रस्त्यांवर कचरा साफ करत बसलो असतो’
गेल सांगतो की, ‘एक दिवस मला भूक लागली होती आणि घरी खायला काहीच अन्न नव्हते आणि माझ्या खिशात पैसे सुद्धा नव्हते, त्यावेळेस मी पोट भरण्यासाठी चोरी केली होती. पण क्रिकेटने माझं संपूर्ण आयुष्य बदलून टाकले. माझ्या आयुष्यात क्रिकेट नसतं तर आज मी त्याच रस्त्यावर असतो’.
आज गेलकडे जगातील सर्व सुविधा आहेत आणि तो एक उत्तम लाइफस्टाइल जगतो आहे. सध्या तो करोडो रुपयांचा घरात राहतो आणि त्याच्याकडे अनेक महागातल्या गाड्या आहेत.
ख्रिस गेलने वेस्ट इंडीज संघासाठी १०३ कसोटी सामने खेळले त्यात त्याने ७२१४ धावा केल्या आहेत. ३०१ एकदिवसीय सामन्यात गेलने १०४८० धावा केल्या तसेच १४० टी -२० सामन्यात १६५६ धावा केल्या आहेत. आईपीएल सामन्यात सुद्धा गेलची अफलातून फटकेबाजी पाहण्यास मिळते. १४० आईपीएल सामन्यात ४९५० धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
हे माहित आहे का? साउथॅम्टनमध्ये कसोटी शतक करणारा ‘हा’ आहे एकमेव भारतीय क्रिकेटपटू
खऱ्या अर्थाने दिग्गज! मैदानात उतरताच अँडरसन ठरला इंग्लंडसाठी ‘अशी’ कामगिरी करणारा पहिला क्रिकेटपटू