भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीने रविवारी पुष्टी केली आहे की, यंदा महिला आयपीएल २०२०चे (महिला चॅलेंजर स्पर्धा २०२०) आयोजन करण्यात येईल. आयपीएल गवर्निंग काउंसिलच्या बैठकीत हा निर्णयदेखील घेण्यात आला की, महिला आयपीएल २०२०चे आयोजन १ नोव्हेंबर ते १० नोव्हेंबरदरम्यान युएईमध्ये केले जाईल. या निर्णयामुळे भारतीय महिला क्रिकेटपटू खूप आनंदी आहेत. परंतु, परदेशी महिला क्रिकेटपटूंची चिंता वाढली आहे. International Women’s Cricketers Upset On Women IPL And Women BBL Decision
महिला चॅलेंजर स्पर्धा इंडियन प्रीमियर लीगच्या प्लेऑफ काळात होणार आहेत. पण, ऑस्ट्रेलियामध्ये खेळल्या जाणाऱ्या महिला बिग बॅश लीगचा २०२० हंगाम १७ ऑक्टोबर ते २९ नोव्हेंबर दरम्यान खेळण्यात येणार आहे. परंतु, काही महिला क्रिकेटपटू अशा आहेत, ज्या महिला आयपीएल आणि महिला बिग बॅश लीग दोन्हीचा भाग आहेत. त्यामुळे अशात या क्रिकेटपटू दोन्ही टूर्नामेंट कश्या खेळतील? यावर आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटूंनी प्रतिक्रिया दिल्या आहे.
ऑस्ट्रेलिया महिला संघाची यष्टीरक्षक फलंदाज एलिसा हिलीने म्हटले आहे की, “महिलांचे आयपीएल हे बिग बॅग लीगदरम्यान आहे ही चांगली गोष्ट आहे. पण, यामुळे ज्या भारतीय महिला क्रिकेटपटूंनी बिग बॅश लीग (बीबीएल)शी करार केला आहे, त्या यामध्ये सहभागी होतील का? आणि ज्या दिग्गज आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटूंना ऑस्ट्रेलियामध्ये बीबीएल खेळायचे आहे, त्या येऊ शकतील का? आयपीएलला निवडक क्रिकेटपचूंची गरज नाही का? महिला बीग बॅश लीग आणि पुरुष बीग बॅश लीगचे एकावेळी आयोजन केले जात नाही. तर, महिला आयपीएल आणि पुरुष आयपीएलचे का करण्यात येत आहे?”
Selfish?! If you actually read the thread it’s about players – including the Indian players with WBBL contracts who’ve been wanting to play it…… also includes every other international player who’d love to support the Women’s IPL but can’t because they’re contracted to WBBL https://t.co/kMSCZLpjQP
— Alyssa Healy (@ahealy77) August 2, 2020
The @IPL doesn’t need the marquee players. It’s already large. The women’s format however does. The wbbl and bbl don’t run simultaneously so why does the IPL and WIPL have to?
— Alyssa Healy (@ahealy77) August 2, 2020
तसेच, ऑस्ट्रेलियाची महिला क्रिकेटपटू रचेल हायनेस म्हणाली की, “जर हे (आयपीएल आणि बीबीएल एकाच वेळी) सत्य असेल तर ही खूप लाजिरवानी गोष्ट आहे. आयपीएलकडून बिग बॅश लीगला प्रोत्साहन मिळायला पाहिजे, पण इथे तर हे एकमेकांसोबत प्रतिस्पर्धा करत आहेत.”
https://twitter.com/SuzieWBates/status/1289870953493626881
न्यूझीलंडच्या सूझी बेट्सने तिची निराशा सोशल मीडियावर जाहीर केली. बेट्सने ट्वीट केले की, या दोन्ही टूर्नामेंटसाठी ही खूप लाजिरवानी बाब आहे. तर, इंग्लंडची चार्लोट एडवर्ड्सने सर्व महिला टूर्नामेंटला विंडो मिळायला हवा, असे म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
आईच्या मदतीने सुरु झाली होती डिविलियर्सची प्रेमकहानी, भारतातच केले होते प्रपोज
एक फलंदाज तर दुसरा अष्टपैलू, २ रिटायर क्रिकेटर रोहितला हवे आहेत मुंबई इंडियन्समध्ये
टीम इंडिया आता वापरणार नवी जर्सी, बीसीसीआयने काढले नविन टेंडर
ट्रेंडिंग लेख –
आयपीएल २०२०- या ५ सलामी जोड्यांवर असेल सर्वांची नजर
वाढदिवस विशेष: शतकातील सर्वोत्तम झेल घेणारा वेसबर्ट ड्रेक्स
गोष्ट एका क्रिकेटरची भाग १९: पाकिस्तानला नेहमीच घाम फोडणारा वेंकटेश प्रसाद