fbpx
Thursday, April 22, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आयपीएल २०२०- या ५ सलामी जोड्यांवर असेल सर्वांची नजर

IPL 2020: All eyes will be on these 5 opening pairs

August 5, 2020
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
0

आयपीएल २०२० ची सुरुवात १९ सप्टेंबरपासून होणार आहे. २०२० आयपीएलचा लिलाव १९ डिसेंबर २०१९ रोजी झाला होता. लिलावात सर्व संघांनी एकूण ६२ खेळाडू खरेदी केले. ज्यात २९ विदेशी खेळाडूंचादेखील समावेश होता. लिलावात संघमालक जास्त गोलंदाजांचा शोध घेताना दिसले पण सलामीवीरदेखील यात फारसे मागे नव्हते. या वेळी लिलावात बऱ्याच संघांनी सलामीवीर देखील खरेदी करण्यात केले. आयपीएल २०२० मध्ये सर्व संघांकडे चांगले सलामीवीर आहेत. काही संघानी आपले आधीचे सलामीवीर ठेवले तर काही संघांनी ते बदलले.

यावर्षी आयपीएलमध्ये सर्व संघांची सलामीची जोडी संघाला चांगली सुरुवात देण्यास जबाबदार असेल. यावेळी चाहत्यांना आयपीएलसाठी बरीच प्रतीक्षा करावी लागली. म्हणूनच आज या लेखात अशाच काही खास ५ सलामी जोड्यांबद्दल जाणून घेऊ, ज्यांच्यावर सर्वांचेलक्ष असेल.

५. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal challengers bangalore) – पार्थिव पटेल-आरोन फिंच

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघातून गेलच्या जाण्याने नेहमीच या संघाचा सलामी जोडीचा कमकुवतपणा दिसून आला आहे. पण यावर्षी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आपल्या संघात एक शानदार सलामीवीर कायम ठेवला आहे. यावर्षीच्या लिलावात आरसीबीने दोन ऑस्ट्रेलियन खेळाडूंसह तीन फलंदाज विकत घेतले आहेत. त्यात दोघे सलामीवीर म्हणजे जोश फिलिप्स आणि अ‍ॅरोन फिंच यांचा समावेश आहे.

दरम्यान, त्याच्याकडे देवदत्त पद्धिकल आणि पार्थिव पटेल आहेत आणि सुरुवातीला विराट कोहलीनेही फलंदाजी केली आहे. परंतु आता असे दिसते आहे की फिंच आणि पटेल आरसीबीचा डाव सुरू करण्यास तयार आहेत.

मागील वर्षी आरसीबीसाठी सर्वाधिक धावा करणारा पार्थिव तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज होता. त्याने १३९.३७ च्या स्ट्राईक रेटने ३७३ धावा केल्या. दुसरीकडे, फिंच हा एक स्फोटक टी-२० खेळाडू देखील आहे. तो एक अनुभवी खेळाडू आहे आणि त्याच्या टी-२० कारकिर्दीत स्ट्राइक-रेट १४३.६८ असा आहे. म्हणूनच यावेळी फिंच-पार्थिव जोडी किती हिट होते यावर सर्वांचे लक्ष असेल.

४. दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) – शिखर धवन-पृथ्वी शॉ

दिल्ली कॅपिटल संघात सलामीवीरांसाठी अनेक पर्याय आहेत. टी-२० क्रिकेटमध्ये नियमित फलंदाजी करणारे त्यांच्याजवळ जवळपास सहा खेळाडू आहेत. त्यांच्याकडे शिखर धवन, पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे, जेसन रॉय, अ‍ॅलेक्स कॅरी आणि मार्कस स्टयनिस आहेत.
मात्र, मागील वर्षाप्रमाणेच दिल्लीही भारतीय सलामीच्या जोडीची निवड करू शकते. या संघाकडून धवन आणि शॉ ही सलामीची जोडी मागील वर्षांपासून डावाची सुरुवात करताना दिसते. गेल्या वर्षी धवनने ५२१ धावा केल्या आणि शॉने देखील ३५३ धावा केल्या.
पृथ्वी शॉ आणि शिखर धवन यंदाही डावाची सुरुवात करताना दिसू शकतात. ही सलामीची जोडी भारतासाठीदेखील सलामीला येऊ शकते. म्हणून प्रत्येकजण ह्या सलामी जोडीचा खेळ पाहण्यास आतुर आहे.

३. मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) – रोहित शर्मा-क्विंटन डी कॉक

इंडियन प्रीमियर लीगमधील मुंबई इंडियन्स हा एकमेव संघ आहे, ज्याने सर्वाधिक वेळा म्हणजेच ४ वेळा आयपीएल विजेतेपद जिंकले आहे. जेव्हापासून मुंबई इंडियन्सची कमान रोहित शर्माच्या हातात आली तेव्हापासून संघाने यशाचा झेंडा उभारला आहे.

रोहित शर्माच्या नेतृत्वात संघाने आयपीएलच्या दिग्गज संघाना चार वेळा पराभूत करून हे विजेतेपद जिंकले. या यशामुळे सर्वांचे लक्ष रोहितच्या संघाकडे लागले आहे. यामुळेच मुंबई इंडियन्सची सलामीची जोडी क्विंटन डी कॉक आणि रोहित शर्मा हे डावाची सुरुवात कशी करतात हे पाहण्यास सर्व आतुर आहेत.

ही जोडी आयपीएलची सर्वात खास जोडी आहे, कारण या संघात हे दोन सलामीवीर आहेत जे कुठेतरी त्यांच्या संघाचे कर्णधारही आहेत. रोहित मुंबईचा कर्णधार आहे आणि डी कॉक हा त्याच्या राष्ट्रीय संघाचा म्हणजेच दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार आहे. आता मुंबई संघाची सलामीची धुरा या दोघांवर असेल.

२. कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) – टॉम बेंटन-सुनील नारायण

इंडियन प्रीमियर लीगमध्ये कोलकाता नाइट रायडर्स या संघाने स्पर्धेत आतापर्यंतच्या प्रवासात दोनदा आयपीएल विजेतेपद जिंकले आहे. याच संपूर्ण श्रेय कर्णधार आणि संघातील खेळाडूंना जाते.

कोलकाता संघाने २०१२ मध्ये प्रथमच चेन्नई सुपर किंग्जचा पराभव करून हे विजेतेपद जिंकले होते. कोलकाता संघाच्या सलामीच्या जोडीबद्दल विचार केला तर यावेळी टॉम बेंटन आणि सुनील नारायण हे संघाच्या वतीने सलामीला दिसू शकतात.

सुनील नारायणबद्दल सर्वांना माहिती आहे, तर टॉम बेंटन अवघ्या २१ वर्षांचा आहे. यंदा तो आयपीएल करिअरची सुरुवात कोलकाता नाईट रायडर्सपासून करणार आहे. टॉम बेंटनने आतापर्यंत टी-२० कारकीर्दीत केवळ २१ सामने खेळले आहेत. यात त्याने १५६.३६ च्या स्ट्राइक रेटने एकूण ६६३ धावा केल्या आहेत. आयपीएल २०२० मध्ये ही सलामीची जोडी पाहण्यास मिळेल.

१. सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) – डेव्हिड वॉर्नर-जॉनी बेयरस्टो

सनरायझर्स हैदराबादची आयपीएल २०१९ मधील कामगिरीही उत्तम होती. या संघाने मागील हंगामात उत्कृष्ट कामगिरी करत प्लेऑफपर्यंतचा पोहचली होती. हा संघ जरी अंतिम फेरी गाठण्यात यशस्वी होऊ शकला नसला, तरी त्यांच्या उत्कृष्ठ कामगिरीमागे संघाच्या सलामीच्या जोडीचा मोठा हात होता. वॉर्नर आणि बेअरस्टो या जोडीने आयपीएल २०१९ मध्ये आपला दबदबा निर्माण केला होता. ही जोडी २०२० मध्ये पुन्हा आपला दबदबा करण्यास उत्सुक असेल.

मागीलवर्षी वॉर्नरने ६९२ धावा केल्या होत्या. तर बेअरस्टोने ४४५ धावा केल्या होत्या. यावेळी त्या दोघांनीही प्रत्येकी १ शतक केले होते.

पण या वेळी संघात समाविष्ट झालेल्या खेळाडूंच्या आधारे असे म्हणता येईल की आगामी सत्रात हा संघ अन्य संघांसमोर एक कठोर आव्हान ठेवेल.

ट्रेंडिंग लेख –

इतिहासात नोंद झालेली विकेट आणि वेंकटेश प्रसाद

गोष्ट एका क्रिकेटरची भाग १९: पाकिस्तानला नेहमीच घाम फोडणारा वेंकटेश प्रसाद

आजच्याच दिवशी ८८ वर्षांपूर्वी सीके नायडूंनी मारला होता तो ऐतिहासिक षटकार

महत्त्वाच्या बातम्या – 

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माच्या होतील ५ कोरोना टेस्ट, काय आहे कारण?

तो एक शांत क्रिकेटर होता, द्रविडच्या मदतीने राजस्थान रॉयल्समध्ये झाला विस्फोटक फलंदाज

भारतासहित जगातील २८ संघांना न जमलेला कारनामा काल आयर्लंडने वनडेत करुन दाखवला


Previous Post

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माच्या होतील ५ कोरोना टेस्ट, काय आहे कारण?

Next Post

भारतातील त्या खेळीनंतर तब्बल ९ वर्ष पाहिली वाट, आज इंग्लंडविरुद्ध केला खास कारनामा

Related Posts

Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

“आरसीबीमध्ये सामील झालेल्या पहिल्या दिवसापासून वाटते की मी माझ्या घरात आहे”, दिग्गज खेळाडूची प्रतिक्रिया 

April 22, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

पहिल्याच षटकात गोलंदाजी करण्याची ‘त्याला’ नव्हती कल्पना, वॉर्नरने योजनेमागील सांगितले अजब कारण

April 22, 2021
Photo Courtesy: Twitter/ICC
टॉप बातम्या

शारजातील सचिनच्या ‘त्या’ वादळी खेळीवेळीची आयसीसी वनडे क्रमवारी

April 22, 2021
Photo Courtesy: Twitter/ICC
टॉप बातम्या

सचिन जेव्हा शारजात शानदार खेळला तेव्हा त्याचा सीव्ही कसा होता?

April 22, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

आठ वर्षात जमले नाही ते धोनीने आयपीएलच्या यंदाच्या हंगामात केले, पाहा चक्रावून टाकणार रेकॉर्ड

April 22, 2021
Photo Courtesy: Facebook/IPL
IPL

मुंबई इंडियन्ससाठी आनंदाची बातमी! कोरोनातून सावरल्याने ‘हा’ सदस्य करणार पुनरागमन

April 22, 2021
Next Post

भारतातील त्या खेळीनंतर तब्बल ९ वर्ष पाहिली वाट, आज इंग्लंडविरुद्ध केला खास कारनामा

वाढदिवस विशेष: आमीर सोहेलला "पेहली फुरसत से निकल" म्हणणारा वेंकटेश प्रसाद

बीसीसीआय म्हणते; हा फॉर्म भरुन द्या, तरच क्रिकेट खेळा, अन्यथा

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.