fbpx
Thursday, April 22, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माच्या होतील ५ कोरोना टेस्ट, काय आहे कारण?

Mumbai Indian Players Will Undergo 5 Corona Test

August 5, 2020
in Covid19, IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
0

१९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर दरम्यान संयुक्त अरब अमिराती अर्थात युएईमध्ये आयपीएल २०२० खेळले जाणार आहे. ४ महिन्यांच्या लॉकडाऊनमुळे त्रस्त झालेले खेळाडू आयपीएलमध्ये खेळण्यासाठी खूप उत्सुक आहेत. आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ म्हणजे  मुंबई इंडियन्स. या संघातील देशांतर्गत खेळाडूंनी तर आपला मोर्चा मुंबईकडे वळवला आहे. मुंबईमध्ये पोहोचलेल्या खेळाडूंना फ्रंचायझीकडून १४ दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात येणार आहे.

क्वारंटाईनमध्ये असलेले खेळाडू फक्त कोरोना चाचणीच्या वेळी बाहेर येऊ शकतात. इतर वेळी त्यांना त्यांच्या खोलीतच रहावे लागले. त्यांना त्यांच्या खोलीत सर्व सोई-सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील.

मुंबई इंडियन्सच्या एका अधिकाऱ्याने आयएएनएसला बोलताना म्हटले की, “देशांतर्गत खेळाडूंप्रमाणेच भारतीय संघातील खेळाडूंनीही लवकरात लवकर मुंबईसाठी मागर्स्थ व्हायला पाहिजे. जेणेकरुन देशांतर्गत खेळाडूंप्रमाणे त्यांनाही १४ दिवसांची क्वारंटाईन प्रक्रिया लवकरात लवकर संपवता येईल आणि मैदानावर सराव करण्यासाठी वेळ मिळेल.”

रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखालील मुंबई इंडियन्स संघाची एक किंवा दोन वेळा नाही तर, तब्बल पाच वेळा कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. त्यानंतरच मुंबई इंडियन्स हा संघ युएईला रवाना होईल. “संघातील सर्व खेळाडूंना आणि इतर सहकारी कर्मचाऱ्यांना मुंबईला येण्यापुर्वी घरीच २ वेळा त्यांची कोरोना चाचणी करावी लागेल. त्यानंतर मुंबईमध्ये पोहोचल्यानंतर क्वारंटाईनमध्ये असताना फ्रंचायझीकडून त्यांच्या ३ कोरोना चाचणी केल्या जातील. अशाप्रकारे खेळाडूंच्या ५ कोरोना चाचणी घेतल्या जातील,” असे पुढे बोलताना मुंबई इंडियन्सचे अधिकारी म्हणाले. Mumbai Indian Players Will Undergo 5 Corona Test

४ वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकणारा मुंबई इंडियन्स २१ ऑगस्ट किंवा २२ ऑगस्ट रोजी युएईला जाण्यासाठी रवाना होऊ शकतो. त्यांना ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात युएईला जायचे होते. पण, आयपीएल गवर्निंग काउंसिलने बैठकीत स्पष्ट केले आहे की, आयपीएलमधील कोणताही संघ २० ऑगस्टनंतर युएईला जाऊ शकतो. त्यामुळे मुंबई इंडियन्सने त्यांच्या निर्णयात बदल केला आहे.

मुंबई इंडियन्स हा आयपीएलमध्ये सर्वाधिकवेळा विजेतेपद मिळवणारा संघ आहे. त्यांनी २०१३ला पहिल्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकली होती. त्यावेळी रोहित शर्मा हा पहिल्यांदा संघाचा कर्णधार बनला होता. त्यानंतर रोहितच्या नेतृत्त्वाखाली संघाने २०१५, २०१७ आणि २०१९ या आयपीएल हंगामात विजेतेपद पटकावले.

महत्त्वाच्या बातम्या –

भारतासहित जगातील २८ संघांना न जमलेला कारनामा काल आयर्लंडने वनडेत करुन दाखवला

आजपासून इंग्लंड पाकिस्तान कसोटी मालिकेला सुरुवात, जाणून घ्या सर्वकाही

कोरोनाबाधीताबरोबर घालवला वेळ, दोन मोठे क्रिकेटर कॅरेबियन लीगमधून बाहेर

ट्रेंडिंग लेख –

५ असे क्रिकेटर, जे आयपीएल २०२० दरम्यान स्वत:ला फिनीशर म्हणून सिद्ध करायला उत्सुक

धोनीच्या लाडक्या खेळाडूसह या ५ क्रिकेटर्सचं नशीब आयपीएलमध्ये राहिलं खराब

क्रिकेटच्या टी-२० प्रकारात सर्वाधिक चेंडू खेळणारे ७ क्रिकेटर, २ आहेत भारतीय


Previous Post

तो एक शांत क्रिकेटर होता, द्रविडच्या मदतीने राजस्थान रॉयल्समध्ये झाला विस्फोटक फलंदाज

Next Post

आयपीएल २०२०- या ५ सलामी जोड्यांवर असेल सर्वांची नजर

Related Posts

Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

“आरसीबीमध्ये सामील झालेल्या पहिल्या दिवसापासून वाटते की मी माझ्या घरात आहे”, दिग्गज खेळाडूची प्रतिक्रिया 

April 22, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

पहिल्याच षटकात गोलंदाजी करण्याची ‘त्याला’ नव्हती कल्पना, वॉर्नरने योजनेमागील सांगितले अजब कारण

April 22, 2021
Photo Courtesy: Twitter/ICC
टॉप बातम्या

शारजातील सचिनच्या ‘त्या’ वादळी खेळीवेळीची आयसीसी वनडे क्रमवारी

April 22, 2021
Photo Courtesy: Twitter/ICC
टॉप बातम्या

सचिन जेव्हा शारजात शानदार खेळला तेव्हा त्याचा सीव्ही कसा होता?

April 22, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

आठ वर्षात जमले नाही ते धोनीने आयपीएलच्या यंदाच्या हंगामात केले, पाहा चक्रावून टाकणार रेकॉर्ड

April 22, 2021
Photo Courtesy: Facebook/IPL
IPL

मुंबई इंडियन्ससाठी आनंदाची बातमी! कोरोनातून सावरल्याने ‘हा’ सदस्य करणार पुनरागमन

April 22, 2021
Next Post

आयपीएल २०२०- या ५ सलामी जोड्यांवर असेल सर्वांची नजर

भारतातील त्या खेळीनंतर तब्बल ९ वर्ष पाहिली वाट, आज इंग्लंडविरुद्ध केला खास कारनामा

वाढदिवस विशेष: आमीर सोहेलला "पेहली फुरसत से निकल" म्हणणारा वेंकटेश प्रसाद

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.