-अनिल भोईर
प्रो कबड्डीच्या सातव्या मोसमाला 20 जूलैपासून सुरुवात झाली. या मोसमासाठी काही संघांनी नेतृत्वामध्ये बदल केला आहे. पण दबंग दिल्लीने जोगिंदर नरवालवरील विश्वास कायम ठेवताना यामोसमासाठीही त्याच्याकडेच कर्णधारपदाची धूरा सोपवली आहे.
दिल्ली या मोसमातील पहिला सामना बुधवारी(24 जूलै) तेलगू टायन्स विरुद्ध खेळणार आहे. या मोसमाची सुरुवात करण्याआधी कर्णधार जोगिंदर नरवालची महास्पोर्ट्सने खास मुलाखत घेतली.
या मुलाखतीदरम्यान जोगिंदरला या मोसमासाठी संघाने केलेल्या तयारीबद्दल विचारण्यात आले. त्यावेळी जोगिंदर म्हणाला. ‘मोसमाची सुरुवात करण्यासाठी आमचा संघ एकदम तयार आहे. आमचा संघ पूर्ण फिट असल्याने आम्ही चांगल्या तयारीत आहोत.’
यावर्षीही दिल्लीचे नेतृत्व करण्याबद्दल तो म्हणाला, ‘मागील मोसमातही आम्ही चांगली कामगिरी केली होती. यावेळी काही नवीन खेळाडू संघात सामील झाले आहेत. आमची इच्छा आहे की आम्ही अंतिम सामना खेळावा आणि ट्रॉफी जिंकावी.’
पुढे त्याला संघातील रेडींगच्या फळीबद्दल विचारल्यावर तो म्हणाला, ‘आमच्याकडे 5 रेडर्स आहेत. नवीन कुमार, चंद्रन रणजीत आणि नीरज नावाचा एक खेळाडू आहे. आमच्याकडे चांगले दोन तीन बाजू सांभाळू शकतील असे डीफेंडर्सदेखील आहेत. तसेच आमच्याकडे चांगले रेडर्सपण आहेत. रेडर्स आमचे याआधीही चांगले होते. तसेच अष्टपैलू खेळाडून मध्ये अनुभवी मिरज शेख आहे.’
डीफेंडर्सबद्दल तो म्हणाला, ‘मागच्यावेळी पेक्षा आमचा डिफेन्स चांगला झालाय. आमच्याकडे सध्या चांगले नवीन खेळाडू आहेत. त्याची पूर्ण तयारी करून घेतली आहे. डिफेन्समध्ये नवीन अनिल कुमार एक खेळाडू आहे, तसेच सुमित आणि मोहित ही भावांची जोडी आहे.’
मागील मोसमाप्रमाणे या मोसमातही जोगिंदर-रविंदर या जोडीची खास कामगिरी पहायला मिळणार का, असे विचारल्यावर तो म्हणाला, ‘तूम्ही आमच्यासाठी प्रार्थना करा, की आमच्या जोडीने चागंले खेळावे, चांगले प्रदर्शन करावे आणि संघाला पुढे घेऊन जावे.’
जोगिंदरला दिल्ली संघाकडून यावेळी कोणता खेळाडू हुकुमाचा एक्का म्हणून समोर येईल, असे विचारले असता, तो म्हणाला, ‘ विजय एक चांगला अष्टपैलू खेळाडु आहे. तो चांगली रेडींग करतो आणि तो चांगला डीफेंन्स पण करतो. आमच्याकडे चांगले नवीन खेळाडू आहेत. त्यांच्यापैकी कोणालाही खेळवले तरी ते चांगले खेळतील.
तसेच या मोसमातील कोणता संघ तगडा आहे, यावर जोगिंदर म्हणाला, ‘सर्व संघ मला चांगलेच वाटतात. सर्व संघांनी चांगली तयारी केली आहे. सर्वांनी स्पर्धेच्या आधी कॅम्प लावले होते. मी असे म्हणणार नाही की आमचा संघ इतरांपेक्षा चांगला आहे पण मी असेही नाही म्हणत की आमचा संघ कमजोर आहे.’
‘जो संघ चांगली कामगिरी करेल, जो संघ चांगल्या मनस्थितीत खेळेल, विचार करुन खेळेल, तो संघ पुढे जाईल. हीच आमची रणनीती आहे. चांगल्या मनस्थिती आणि विचार करुन खेळायचे हाच सध्या आम्ही विचार करत आहोत.’
प्रशिक्षकांबद्दल जोगिंदर म्हणाला, ‘कृष्णन हुडा या आमच्या प्रशिक्षकांनी आमच्याकडून चांगला सराव करुन घेतला आहे. तसेच. आमचे प्रशिक्षक वेगवेगळ्या प्रकारे सराव करुन घेतात. आम्ही विविध प्रशिक्षकांबरोबर सराव केले आहे. पण हे प्रशिक्षक खूप वेगळ्याप्रकारे सराव करुन घेतात.’
बुधवारी दिल्लीचा तेलगु टायटन्स विरुद्ध होणारा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8.30 वाजता सुरु होणार आहे. हा सामना गचीबावली इनडोअर स्टेडीयम, हैद्राबाद येथे होणार आहे. तसेच दिल्लीचे घरचे सामना 24 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट या दरम्यान होणार आहेत.
Experience aur skill ka perfect match, Joginder Narwal is once again ready to lead us from the front.
.
.
.#BuraNaManoDilliHai #JoginderNarwal #captain #VIVOProKabaddi #PKLSeason7 #DabangDelhiKabaddiClub #DabangDelhi #ProKabaddiLeague #Season7 #KabaddiKabaddi #dillidilli pic.twitter.com/q6XFek2hWH— Dabang Delhi KC (@DabangDelhiKC) July 20, 2019
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–मुलाखत: प्रो कबड्डी सीजन ७ मध्ये नवा नवीन बघायला मिळेल- नवीन कुमार
–अनिल भोईर यांची महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.च्या प्रसिद्धी व प्रकाशन समितीवर सदस्य म्हणून निवड