गुरुवारी (२९ जुलै) भारत विरुद्ध श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये टी -२० मालिकेतील अंतिम आणि निर्णायक टी-२० सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाला ७ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला. भारतीय संघ पराभूत झाला असला तरी देखील सर्वच स्तरातून या संघाचे कौतुक केले जात आहे. याचे कारण असे की, कृणाल पंड्याला कोरोनाची लागण झाल्यानंतर संघातील मुख्य खेळाडू बाहेर झाले होते. त्यावेळी भारतीय संघ मालिका न खेळण्याचा निर्णय घेऊ शकला असता. परंतु त्यांनी असे केले नाही.
दुसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघ अवघ्या ५ फलंदाजांसह मैदानात उतरला होता. हे पाहून माजी पाकिस्तानी कर्णधार इंजमाम उल हक यांना भरपूर प्रभावित झाले आहेत. याबाबत त्यांनी आपली प्रतिक्रिया देखील दिली आहे.(Inzamam ul haq applauded team india efforts after losing the game)
इंजमाम उल हक यांनी आपल्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना म्हटले की, “भारतीय संघाला कोविड-१९ चा जबरदस्त फटका बसला .कारण कृणाल पंड्यासह त्यांचे ८ प्रमुख खेळाडू खेळण्यासाठी उपलब्ध नव्हते. त्यांच्याकडे हा सामना खेळण्यासाठी नकार देण्याचा पर्याय उपलब्ध होता. परंतु त्यांनी असे केले नाही आणि ते दुसरा टी-२० सामना खेळण्यासाठी मैदानात उतरले. यावरून स्पष्ट होते की, भारतीय संघ पराभवाला घाबरत नाही.”
तसेच माजी कर्णधारांनी पुढे म्हटले की, “जेव्हा तुम्ही पराभवाला घाबरत नाही, तेव्हा जिंकण्याचे मार्ग आपोआप मोकळे होत असतात. त्यांनी या खेळाडूंवर विश्वास दाखवला जे खेळण्यासाठी उपलब्ध होते. भुवनेश्वर कुमारने सहाव्या क्रमांकावर फलंदाजी केली. कारण संघात फक्त ५ फलंदाज उपलब्ध होते. यावरून या संघात किती बळ आहे हे दिसून येते. याचे संपूर्ण श्रेय प्रशिक्षक राहुल द्रविडला जाते.”
तसेच तिसऱ्या आणि निर्णायक टी२० सामन्यातही नवदीप सैनी दुखापतीमुळे बाहेर झाल्याने संदीप वॉरियर या नव्या गोलंदाजाला खेळवण्याचा धाडसी निर्णय घेण्यात आला. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु हा निर्णय पूर्णपणे फसला. कुलदीप यादवच्या २३ धावा सोडल्या तर एकाही फलंदाजाला मोठी खेळी साकारता आली नाही. २० षटक अखेर भारतीय संघाला ८ बाद ८१ धावा करण्यात यश आले होते. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या श्रीलंका संघाने हे आव्हान ७ गडी आणि ३० चेंडू शिल्लक ठेऊन पूर्ण केले. यासह ही मालिका २-१ ने आपल्या नावावर केली.
महत्त्वाच्या बातम्या-
हृदय जिंकलंस! ज्यांनी टी२० मालिकेत दिला दारुण पराभवाचा धक्का, त्यांनाच ‘गब्बर’ने दिला बहुमुल्य वेळ
विजयाचा उन्माद! टी२० मालिकेत श्रीलंकेचा टीम धवनला धोबीपछाड, जल्लोषात हसरंगाचे लाजिरवाणे कृत्य
वयाच्या तिशीत वॉरियरच्या डोक्यावर सजली ‘पदार्पणाची कॅप’; आनंदाने झाला भावूक, फुटलं रडू