सध्या काही भारतीय कुस्तीपटू दिल्ली येथील जंतर मंतर येथे सामूहिक उपोषणास बसले आहेत. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष खासदार बृजभूषण सिंग यांच्यावर काही महिला खेळाडूंनी लैंगिक शोषणाचे आरोप केले असून, जोपर्यंत सिंग यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत हे उपोषण सुरू राहणार असल्याचे म्हटले आहे. मात्र, त्याचवेळी राज्यसभा खासदार व भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्ष पी टी उषा यांनी या खेळाडूंवर देशाला कलंकित करत असल्याचा आरोप केला आहे.
दिल्ली येथील कॅनॉट प्लेस पोलीस ठाण्यात सिंग यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून, त्यांच्यावर कारवाई झालेली नाही. एकूण 7 महिला कुस्तीपटूंनी त्यांच्या विरोधात तक्रार दिलेली आहे. त्यापैकी एक मुलगी अल्पवयीन असल्याने पॉस्को कायद्यांतर्गत ही त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. सर्वोच्च न्यायालयाने देखील सिंग यांच्यावर गुन्हा दाखल करून घेण्याची सूचना केली होती.
या सर्व मुद्द्यावर बोलताना पी टी उषा म्हणाल्या,
“अशाप्रकारे आंदोलन करून खेळाडू देशाची प्रतिमा कलंकित करत आहे. त्यांचे हे कृत्य खेळाच्या शिस्तीत बसत नाही.”
या आंदोलनाचे नेतृत्व करत असलेला ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू बजरंग पुनिया याने पी टी उषा यांचे हे वक्तव्य हैराण करणार असल्याचे म्हटले. एक खेळाडू म्हणून त्यांनी पाठिंबा देणे गरजेचे होते असे त्याने म्हटले.
जानेवारी महिन्यात याच कुस्तीपटूंनी दिल्ली येथील जंतर मंतर या ठिकाणी आंदोलन केले होते. बृजभूषण सिंह हे महासंघात मनमानी कारभार करत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. तसेच त्यांनी अनेक महिला कुस्तीपटूंचे लैंगिक केल्याचा आरोप देखील त्यांनी लावलेला. सिंग यांनी हे सर्व आरोप फेटाळले होते. त्यानंतर या प्रकरणात दिग्गज बॉक्सर मेरी कोम हिचा समावेश असलेली एक सदस्यीय समिती क्रीडा मंत्रालयाने बनवली होती. ही समिती कुस्ती महासंघाचा कारभार पाहते.
(IOA President PT Usha Said Wrestler Protest Threshing India Image In Word)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दिल्लीकडून मिळालेली संधी इशांत शर्माने साधली! नेट्समध्ये सराव जोरात सुरू
धक्कादायक! दिल्ली कॅपिटलच्या खेळाडूचे महिलेशी गैरवर्तन, फ्रॅंचाईजी ‘ऍक्शन मोड’वर