दिल्ली | काल दिल्ली डेअरडेविल्स विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद सामन्यात दिल्लीने ९ विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यात दिल्ली डेअरडेविल्सने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ५ बाद १८७ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना सनरायझर्स हैद्राबादने १८.५ षटकांत १ बाद १९१ धावा करत विजय मिळवला.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या दिल्ली डेअरडेविल्सकडून रिषभ पंतने ६३ चेंडूत १२८ धावा केल्या.
याबरोबर त्याने अनेक विक्रमही केले. त्यातील काही विक्रम हे ११ मोसमातही कुणी करु शकले नाही असे होते.
पाहुया यातील काही खास विक्रम-
-दिल्ली डेअरडेविल्सकडून एका सामन्यात सर्वाधिक धावा (नाबाद १२८ धावा) करणारा खेळाडू.
-आयपीएल २०१८मध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू. त्याने ५२१ धावा करत केन विलियम्सला (४७१ धावा) मागे टाकले.
-टी२० सामन्यात २०१८मध्ये सर्वाधिक धावा करणारा रिषभ पंत हा पहिला खेळाडू. त्याने यावर्षी सर्व सामने मिळुन ९६२ धावा केल्या आहेत.
-पंतने काल केलेली शतकी खेळी ही आयपीएलच्या इतिहासातील ५०वी शतकी खेळी होती.
-नाबाद १२८ या आयपीएलमधील एका सामन्यात भारतीय खेळाडूने केलेल्या सर्वाधिक धावा
-भारतीय खेळाडूने टी२०मध्ये केलेल्या सर्वाधिक धावा.
-आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा तो दुसरा सर्वात तरुण खेळाडू
-एकाच सामन्यात तीन खेळाडूंनी ८० किंवा त्यापेक्षा अधिक धावा करायची ही पहिलीच वेळ
-पराभुत झालेल्या सामन्यात खेळाडूने केलेल्या १२८ या सर्वाधिक धावा
-आयपीएलमध्ये १००० धावा करणारा रिषभ पंत हा सर्वात तरुण खेळाडू
-एका आयपीएल हंगामात २५ षटकार मारणारा रिषभ पंत हा सर्वात तरुण खेळाडू
-एका हंगामात ५०० धावा करणारा रिषभ पंत हा सर्वात तरुण खेळाडू
दिवसातील महत्त्वाच्या बातम्या-
–टाॅप ५- अायपीएलमध्ये सर्वाधिक विजय मिळवणारे कर्णधार
–आयपीएल २०१८ प्ले आॅफमध्ये प्रवेश करणारा हा होऊ शकतो पहिला संघ
–उद्याचा दिवस क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णांक्षरांनी लिहीला जाणार
–वनडेतील सर्वात अनुभवी खेळाडू करणार २०१९ला क्रिकेटला टाटा-बायबाय
–रोहितचा असाही एक विक्रम जो काल फारसा कुणाच्या ध्यानात आला नाही
–सगळे प्रयत्न करुन झाले पण केकेआरवर राज्य तर रोहित शर्माची मुंबईच करते!