---Advertisement---

रोहितचा असाही एक विक्रम जो काल फारसा कुणाच्या ध्यानात आला नाही!

On: गुरूवार, मे 10, 2018 11:40 AM
---Advertisement---

कोलकाता | बुधवारी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्यात मुंबईने कोलकाताचा तब्बल १०२ धावांनी पराभव केला. या सामन्यात मुंबईने उभ्या केलेल्या २१० धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना कोलकाताचा डाव १०८ धावांवरच संपुष्टात आला.

या सामन्यात मुंबईकडून इशान किशनने ६२, सुर्याकुमार यादवने ३६, रोहित शर्माने ३६ तर बेन कटिंगने २४ धावा केल्या. कोलकाताकडून कोणत्याही फलंदाजाला विशेष चमक दाखवता आली नाही.

हा कोलकाताचा या मोसमातील ११ सामन्यातील ६वा पराभव ठरला. तर गेले तीन दिवसांत मुंबईने या संघाला दोन वेळा पराभूत केले आहे.

याबरोबर आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादित रोहित शर्मा आता सुरेश रैनासह संयुक्तपणे पहिल्या स्थानावर विराजमान झाला आहे.

रोहितने आयपीएलमध्ये एकूण १७० सामने खेळले आहेत तर सुरेश रैनानेही तेवढेच सामने खेळले आहेत. रोहितने या सर्व सामन्यात मिळुन ४४७४ धावा केल्या आहेत तर रैनाने ४८०१ धावा केल्या आहेत.

आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळणारे खेळाडू-

१७०- सुरेश रैना
१७०- रोहित शर्मा
१६९- एमएस धोनी
१६३- दिनेश कार्तिक
१६०- राॅबीन उथप्पा
१५९- विराट कोहली
१५९- युसुफ पठाण

दिवसातील महत्त्वाच्या बातम्या- 

–सगळे प्रयत्न करुन झाले पण केकेआरवर राज्य तर रोहित शर्माची मुंबईच करते!

–रोहित शर्मा आणि इडन गार्डनचे नाते काही खास!

-एका सामन्यासाठी का बदलणार राजस्थान राॅयल्स जर्सीचा रंग?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment