---Advertisement---

‘धोनी बरोबर होता, चेन्नईच्या युवा खेळाडूंमध्ये…’, मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर उडाली टीकेची झोड

On: शनिवार, ऑक्टोबर 24, 2020 9:53 AM
---Advertisement---

चार दिवसांपूर्वी म्हणजेच सोमवारी (१९ ऑक्टोबर) राजस्थान रॉयल्सविरुद्ध झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सच्या पराभवानंतर कर्णधार एमएस धोनीने संघातील युवा खेळाडूंबद्दल वक्तव्य केले होते. त्याने म्हटले होते की, संघातील युवा खेळाडूंमध्ये कोणताही स्पार्क (प्रतिभा) नाही, जो त्यांना अंतिम अकरामध्ये स्थान देऊ शकतो. यानंतर त्याच्यावर अनेक दिग्गजांसह चाहत्यांनीही टीका केली होती.

कदाचित त्यामुळेच शुक्रवारी (२३ ऑक्टोबर) मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात धोनीने ऋतुराज गायकवाड आणि नारायण जगदीशन या युवा खेळाडूंना संधी दिली होती. परंतु ऋतुराज आणि जगदीशनला संधीचा फायदा घेता आला नाही. त्यानंतर आता चेन्नईचे युवा खेळाडू चांगलेच ट्रोल होत आहेत.

मुंबईने नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. यावेळी प्रथम फलंदाजी करताना चेन्नईकडून ऋतुराज आणि अनुभवी फाफ डू प्लेसिस सलामीला फलंदाजीसाठी उतरले होते. परंतु ऋतुराज गायकवाड पाच चेंडू खेळत डावाच्या पहिल्याच षटकात शून्य धावेवर पव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर दुसऱ्या षटकात फलंदाजीस आलेला अनुभवी फलंदाज अंबाती रायडूही केवळ २ धावा करत बाद झाला.

यानंतर युवा फलंदाज जगदीशन फलंदाजीस आला. परंतु तोदेखील पहिल्याच चेंडूत शून्य धावेवर तंबूत परतला.

अशाप्रकारे सीनियर खेळाडूंसोबतच युवा खेळाडूंनीही चेन्नईला निराश केले. यानंतर सोशल मीडियावर टीकेची झोड उडाली. एका चाहत्याने लिहिले की, “धोनी बरोबर होता. चेन्नईच्या युवा खेळाडूंमध्ये कोणतीही प्रतिभा नाही.”

https://twitter.com/borned_error/status/1319657800671215622

https://twitter.com/amar_gaur_/status/1319652852051054597

चेन्नईच्या दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले की, “जे लोक धोनीच्या युवा खेळाडूंमधील प्रतिभेबद्दल त्याची टीका करत होते, त्यांनी समजून घ्यावे की धोनी महान आहे. त्याला शिकवण्याची आवश्यकता नाही. धोनीला शिकवणाऱ्यांनी घरात भांडी घासणे शिकावे.”

https://twitter.com/rajini712dhoni/status/1319647709402329088

तरीही, चेन्नई संघाने मुंबईविरुद्ध खराब फलंदाजी केली. त्यांचे पहिले ७ खेळाडू अवघ्या ४३ धावांवरच तंबूत परतले. केवळ अष्टपैलू फलंदाज सॅम करनने सर्वाधिक ५२ धावांची अर्धशतकी खेळी करत संघाची धावसंख्या १०० च्या पुढे नेण्यात मोलाचे योगदान दिले. चेन्नई संघाने निर्धारित २० षटकात ९ विकेट्स गमावत ११४ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल मुंबईने केवळ १२.२ षटकात एकही विकेट न गमावता ११६ धावा करत सामना खिशात घातला.

-राहिलेल्या ३ मॅच खेळणार का? पाहा काय होते धोनीचे उत्तर

-‘जिंकणारा संघ नव्हे हा तर वृद्ध कल्याण केंद्र’, माजी क्रिकेटरची सीएसकेवर बोचरी टीका

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---