---Advertisement---

मुंबईच्या भारतीय तिकडीतील ‘या’ खेळाडूला मिळाली दुखापतीतून प्रेरणा, म्हणतोय आता काही….

---Advertisement---

आबुधाबी। कोरोना व्हायरसमुळे लागलेल्या लॉकडाऊनपूर्वी खेळाडूंची जी फीटनेस होती, त्याच फीटनेसमध्ये परतण्याचे मोठे आव्हान खेळाडूंसमोर होते. परंतु येत्या १९ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आयपीएलच्या १३ व्या हंगामासाठी यूएईत पोहोचल्यानंतर खेळाडू आपल्या फीटनेसची काळजी घेताना दिसत आहेत. अशामध्ये दुखापतीतून सावरून दीर्घ काळानंतर पुनरागमन करणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाचा स्टार अष्टपैलू हार्दिक पंड्यासमोरील आव्हानांमध्ये आणखी भर पडली होती. परंतु आता पंड्याचे असे मत आहे की, त्याला पूर्वीपेक्षा अधिक चांगले वाटत आहे.

पंड्याने मिळवली मानसिक आणि शारीरिक लय

मुंबई इंडियन्स संघाच्या ट्विटर अकाऊंटवर टाकण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये पंड्याने म्हटले की, नेटवर संघाच्या सराव सत्रादरम्यान मला माझ्या कामगिरीमुळे पूर्णपणे समाधानकारक वाटत आहे.

“मी ज्या पद्धतीने चेंडूला फटकावत आहे, त्यामुळे मला मानसिक आणि शारीरिकरीत्या पूर्णपणे लय प्राप्त होण्याची जाणीव होत आहे. आता मला मैदानावर जाऊन आपला नैसर्गिक खेळ दाखविण्यात कोणतीही अडचण येणार नाही,” असे आपल्या खेळाबद्दल बोलताना पंड्या म्हणाला.

आयपीएलपूर्वी लॉकडाऊनदरम्यान सराव बंद राहण्याबद्दल बोलताना तो म्हणाला, “मी खेळापासून कितीही दूर आणि बाहेर असला तरी, पुनरागमन केल्यानंतर तुमची उपयुक्तता सिद्ध झाली पाहिजे. मी खूप तयारी केली आहे आणि येणारा काळ चांगलाच असेल.”

आयपीएल २०२०चा पहिला सामना हा गतविजेत्या मुंबई इंडियन्स आणि उपविजेत्या चेन्नई सुपर किंग्ज संघात होणार आहे. अशामध्ये पंड्याचे फॉर्ममध्ये राहणे हे संघासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

दुखापतीमुळे दीर्घकाळानंतर करत आहे पुनरागमन

पंड्या दीर्घ काळ क्रिकेटपासून दूर राहिला आहे. मागील वर्षी वनडे विश्वचषकादरम्यान त्याच्या कमरेला दुखापत झाली होती. त्यामुळे तो खेळापासून दूर झाला होता. त्याला मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये आपल्या पाठीच्या शस्त्रक्रियेसाठी लंडनला जावे लागले होते. त्यानंतर त्याने स्वत:ला फीट सिद्ध केले होते. सोबतच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी त्याला भारतीय संघात निवडण्यात आले होते. परंतु कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मालिका रद्द करण्यात आली होती.

असे असले तरी पंड्या या समस्यांना घाबरला नाही. तो म्हणाला, यामुळे त्याला आणखी मेहनत करण्याची प्रेरणा मिळाली आणि शारीरिक तसेच मानसिकरीत्या तो आता पूर्णपणे फीट आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-टी२० विश्वचषक तर आम्ही जिंकणारच, आयपीएलमध्ये खेळणाऱ्या क्रिकेटरने व्यक्त केला आत्मविश्वास

-पॅट कमिन्सने विचारलं युएईत वातावरण कसं आहे; त्यावर या खेळाडूने दिले मजेशीर उत्तर, म्हणाला…

-८ भाषेत होणार आयपीएलचे प्रक्षेपण, पहा मराठीबद्दल काय झाला निर्णय

ट्रेंडिंग लेख-

-यूएईमध्ये झालेल्या आयपीएल सामन्यांत परदेशी खेळाडूच ठरले होते किंग, फक्त एक भारतीय…

-जेव्हा मुंबई इंडियन्सच्या ड्वेन ब्रावोसाठी अंबानींनी जमैकाला पाठवले थेट प्रायव्हेट जेट

-भले भले क्रिकेटर, जे युवराजच्या नेतृत्त्वाखाली खेळले आयपीएल सामने

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---