कोलकाता नाईट राइडर्स (केकेआर) चा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्यूसन संघाच्या सराव सत्रात भाग घेण्यासाठी या महिन्याच्या सुरुवातीला यूएईमध्ये पोहचला आहे. कोरोना महामारीमुळे खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करत आहेत.
आयपीएलबरोबर जोडलेले सर्व सदस्य यूएईमध्ये बायो सिक्योर बबलमध्ये थांबले आहेत. पण युएईमधील हवामान गरम असल्यामुळे खेळाडूंची मोठी परीक्षा होणार हे नक्की. फर्ग्यूसनचा संघ सहकारी पॅट कमिन्स हा अजून यूएईमध्ये पोहचलेला नाही. कारण इंग्लंडबरोबर चाललेल्या वनडे मालिकेत तो खेळत आहे.
फर्ग्यूसन म्हणाला, “पॅट कमिन्सनी मला मॅसेजमध्ये येथील उष्णतेबद्दल विचारले, आणि मी त्याला खोटे सांगितले की इथले हवामान तितके वाईट नाही. त्याला येथे येऊ द्या आणि हवामान किती खराब आहे ते पाहू द्या.” असंही तो म्हणाला
केकेआरच्या अधिकृत वेबसाईटवरील मुलाखती दरम्यान फर्ग्युसन म्हणाला, “हे खूप उत्साहजनक आहे. न्यूझीलंडकडून मी येथे बर्याच वेळा खेळलो आहे. परंतु मी ईडस गार्डन्सला मिस करेल , माझी नजर इथल्या आव्हानांचा सामना करण्यावर असणार आहे.”
अपेक्षा आहे की, येत्या हंगामात कमिन्स केकेआरसाठी मुख्य भूमिका निभावेल. त्याला १५.५ कोटी खर्च करून केकेआरच्या ताफ्यात सामील करून घेण्यात आले आहे. लिलावात तो सर्वात महाग विकला गेलेला परदेशी खेळाडू ठरला होता. केकेआर आपला पहिला सामना २३ सप्टेंबरला मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळणार आहे.
आयपीएलमधील पहिला सामना १९ सप्टेंबरला गतविजेत्या मुंबई इंडियन्स आणि गतउपविजेत्या चेन्नई सुपर किंग्स यांच्या होणार आहे. भारतातील कोविड १९ च्या वाढत्या घटना लक्षात घेऊन जगातील सर्वात मोठी लीग यावर्षी संयुक्त अरब अमिरातीच्या (यूएई) दुबई, अबू धाबी आणि शारजा या तीन शहरांमध्ये होणार आहे.
केकेआरचा आयपीएल संघ
दिनेश कार्तिक (कर्णधार आणि यष्टीरक्षक), इयोन मॉर्गन, शुभमन गिल, टॉम बँटोम, सुनील नारायण, आंद्रे रसेल, नितीश राणा, राहुल त्रिपाठी, कुलदीप यादव, पॅट कमिन्स, प्रसिद्ध कृष्णा, लॉकी फर्ग्यूसन, रिंकू सिंह, कमलेश नागरकोटी, शिवम मावी, निखिल नायक, ख्रिस ग्रीन, एम सिद्धार्थ, संदीप वारियर, वरुण चक्रवर्ती आणि सिद्धेश लाड