दिल्ली डेअरडेविल्स आणि राॅयल चॅलेंजर बेंगलोर यांच्यात होणाऱ्या सामन्यांच्या ठिकाणांमध्ये काल बदल करण्यात आले. कर्नाटक राज्यात १२ मे रोजी विधानसभेचे मतदान होणार असल्यामुळे हे बदल करण्यात आले आहेत.
बेंगलोर येथे होणारा सामना क्रमांक ४५ आता दिल्ली येथे होणार आहे. हा सामना यजमान राॅयल चॅलेंजर बेंगलोर आणि दिल्ली डेअरडेविल्स संघात चिन्नस्वामी स्टेडिअमवर होणार होता.
तर सामना क्रमांक १९ हा दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानावरून बेंगलोर येथील चिन्नस्वामी स्टेडिअमवर हलवण्यात आला आहे. हा सामना २१ एप्रिल रोजी होईल.
कर्नाटक विधानसभेचे मतदान एकाच टप्प्यात (१२ मे )होणार आहे तर निकाल १५ मे रोजी लागणार आहेत.
गतविजेता मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात ७ एप्रिल रोजी होणाऱ्या सामन्याने आयपीएलचे बिगूल वाजणार आहे. ५१ दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत १२ सामने दुपारी ४ वाजता तर ४८ सामने संध्याकाळी ८ वाजता होणार आहेत.