मुंबई| मागील काही वर्षांपासून भारतीय क्रिकेट स्टेडीयम्सची सुरक्षा कडक करण्यात आली आहे. प्रेक्षकांच्या हिंसात्मक व्यवहारामुळे असे करण्यात आल्याचे समजते.
याआधी अशा प्रकारच्या काही घटना इडन गार्डनवर घडल्या आहेत. तसेच नुकतेच बाराबाती स्टेडियमवरही अश्या प्रकारच्या घटनांचा सामना भारतीय खेळाडू आणि दौऱ्यावर आलेल्या खेळाडूंना करावा लागला.
प्रेक्षक अश्या काही वस्तू मैदानावर फेकतात जेणेकरून खेळाडूंना त्रास होईल. यामुळेच या गोष्टी टाळण्यासाठी फॅन्सना स्टेडियममध्ये जास्त वस्तू घेऊन जाण्याची परवानगी नाही. या वस्तूंमध्ये खासकरून पैशांच्या नाण्यांचा समावेश आहे.
यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशन ( एमसीए) ने एक उपाय शोधला आहे. वानखेडे स्टेडियमच्या प्रवेश गेटमध्ये प्रेक्षकांना त्यांचे हे पैसे (नाणे) ठेवण्यासाठी काही बॉक्स ठेवण्यात आले. मात्र काही लोकांनी या उपायांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांचे असे म्हणने आहे की, या बॉक्समध्ये नाणी ठेवल्याने आम्ही लुटले जात आहोत.
मिड-डे ह्या वृत्तपत्रानुसार, एमसीएकडून हे ते गोळा झालेले पैसे जवळपासच्या मंदिरात दान केले जातात. एमसीएच्या अधिकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
तसेच त्यांनी पुढे असेही सांगितले की,”आम्ही ते बॉक्स उघडूनसुध्दा बघत नाही. प्रत्येक एक किंवा दोन सामन्यांनतर आम्ही ते बॉक्स मंदिरात घेऊन जातो. आम्हांला त्या पैशांच्या नाण्यांशी काही घेणे-देणे नाही. ते पैसे दान करणे हाच सगळ्यात चांगला उपाय आहे.
एका सामन्यामधून आतापर्यंत 2000 रूपये जमा झाले आहेत. या पैशांच्या नाण्यांव्यतिरीक्त पॉवर बॅक्स, हेडफोन्स, बॅग्ज,पेन आदी वस्तू स्टेडियममध्ये घेऊन जाण्यास मनाई आहे. काही स्टेडियममध्ये फॅन्सना त्यांच्या ह्या वस्तू ठेवण्यासाठी क्लॉकरूम्स आहेत. या रूम्समध्ये कमी फीमध्ये फॅन्स आपल्या वस्तू ठेऊन सामना झाल्यानंतर परत घेऊ शकतात.
तसेच प्लॅस्टिक बॉटल्सना पण मनाई आहे. या बॉटल्स मैदानावर फेकले असता खेळाडूंना इजा होऊ शकतात. यासाठीच प्रेकक्षकांना हलक्या प्लॅस्टिक कपमध्ये पाणी दिले जाते.
वाचा प्रो-कबड्डी २०१८च्या खास बातम्या-
–संपुर्ण यादी- दुपारच्या सत्रात प्रो-कबड्डीमध्ये लागल्या या खेळाडूंवर बोली
–आईने केलेली प्रार्थना कामी आली- रिशांक देवडिगा
-संपुर्ण यादी- प्रो कबड्डी लिलावातील सकाळच्या सत्रातील सर्व बोली
-४३ वर्षीय खेळाडूला यु-मुंबाने प्रो-कबड्डीत मोजले तब्बल ४६ लाख
-महाराष्ट्राच्या विराज लांडगेला प्रो-कबड्डी लिलावात दुसऱ्या दिवशी पहिली बोली
-संपुर्ण यादी- पहिल्याच दिवशी प्रो-कबड्डी लिलावात 6 खेळाडू करोडपती
-हा खेळाडू ठरला प्रो-कबड्डी इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू
-प्रो-कबड्डीत 1 कोटी बोली लागलेला रिशांक देवडिगा पहिला महाराष्ट्रीयन खेळाडू






