दिल्ली। आयपीएलमध्ये आज दिल्ली डेअरडेविल्स विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना होणार आहे. या सामन्यात कोलकताने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.
दिल्लीचा संघ आज नवीन कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरणार आहे. हा सामना फिरोजशहा कोटला येथे खेळला जाणार आहे.
आजच्या सामन्यात दिल्लीचा माजी कर्णधार गौतम गंभीर खेळणार नाही. त्याच्या ऐवजी डॅन ख्रिस्टनला संधी मिळाली आहे. तसेच विजय शंकर आणि कॉलिन मुन्रोलाही 11 जणांच्या संघात स्थान मिळाले आहे.
त्याचबरोबर कोलकाता संघात एकमेव बदल झाला आहे. टॉम कुरानच्या ऐवजी मिशेल जॉन्सनला 11 जणांच्या संघात संधी मिळाली आहे.
दिल्लीचा हा 7वा सामना आहे. आधीच्या 6 पैकी फक्त एका सामन्यात विजय मिळवलेली दिल्ली गुणतालिकेत सगळ्यात शेवटी आहे. कोलकाताचा संघ 6 पैकी तीन विजय मिळवून गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे.
याआधी इडन गार्डनवर या दोन संघात झालेल्या सामन्यात कोलकाताने दिल्लीचा 71 धावांनी पराभव केला होता. या सामन्यात कोलकाताने दिल्लीसमोर 200 धावांचे लक्ष्य ठेवले होते.
असे आहेत 11 जणांचे संघ:
दिल्ली डेअरडेविल्स : श्रेयस अय्यर (कर्णधार), रिषभ पंत , ग्लेन मॅक्सवेल, अमित मिश्रा, विजय शंकर, ट्रेंट बोल्ट, डॅन ख्रिस्टन, कॉलिन मुन्रो, राहूल टेवातिया, पृथ्वी शॉ, लियाम प्लकेंट
कोलकाता नाईट रायडर्स: दिनेश कार्तिक (कर्णधार),रॉबीन उथप्पा, आंद्रे रसेल, ख्रिस लीन, पियुष चावला, कुलदिप यादव, मिशेल जॉन्सन, सुनिल नारायन, शुभमन गील, नितीश राणा, शिवम मवी.
महत्त्वाच्या बातम्या –
–भारत पाकिस्तान सामन्यासाठी असे आहेत तिकीटांचे दर
–पहा व्हिडीओ- सिक्सर किंग जेव्हा आजमावतो स्टंपमागे नशीब
–आयपीएल होणारच, पण भारतात नाही तर या देशात!
–आयपीएलमध्ये पहिल्यांदाच जुळून आला असा योगायोग
–भारतीय संघातील या दोन मित्रांचं मराठीतील संभाषण नक्की पहा
–कसोटी क्रिकेट चाहत्यांसाठी हे आहे नाराज करणारे वृत्त
– सामना पराभूत झाला म्हणून काय झाले, त्याने जिंकली चाहत्यांची मने
–टाॅप ७- आयपीएलमध्ये या खेळाडूंनी अर्ध्यातच सोडले कर्णधारपद, संघाचे पुढे काय झाले पहाच
–आमदार चषक कबड्डी स्पर्धेत एअर इंडिया सलामीलाच कोलमडली