---Advertisement---

मुंबई इंडियन्स आयपीएलमधून बाहेर, राजस्थानचे लक्ष पंजाब-चेन्नई सामन्याकडे

On: रविवार, मे 20, 2018 8:04 PM
---Advertisement---

दिल्ली। रविवारी दिल्ली डेयरडविल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात फिरोज शहा कोटला स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात दिल्लीने 11 धावांनी विजय मिळवला आहे.

यामुळे गतविजेत्या मुंबईला प्लेआॅफच्या शर्यतीतून बाहेर पडावे लागले आहे. त्यामुळे आता राजस्थान रॉयल्स किंवा किंग्ज इलेव्हन पंजाबला प्लेआॅफमध्ये प्रवेश करण्याची संधी आहे.

अर्थात, यासाठी किंग्ज इलेव्हन पंजाबला चेन्नई सुपर किेंग्ज विरुद्ध मोठा विजय आवश्यक आहे. कारण राजस्थानने कालच रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध विजय मिळवून 14 गुणांची कमाई केली आहे आणि त्यांचा रनरेट पंजाबपेक्षा जास्त आहे.

दिल्ली डेयरडविल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात झालेल्या सामन्यात दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना रिषभ पंतच्या अर्धशतकाच्या जोरावर मुंबईसमोर विजयासाठी 175 धावांचे आव्हान ठेवले होते.

हे आव्हान पार करताना मुंबईने चांगली सुरवात केली होती. परंतू नियमित अंतराने फलंदाजांनी विकेट गमावल्यामुळे मुंबईला 19.3 षटकात सर्वबाद 163 धावाच करता आल्या.

मुंबईची यावर्षीच्या आयपीएलची सुरवात खराब झाली होती, पण तरीही त्यांनी नंतर केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे त्यांच्या प्लेआॅफच्या आशा जिवंत होत्या.

पंरतू साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यातील पराभवामुळे प्ले-आॅफच्या आशा संपुष्टात आल्या.

-पंजाब संघ असा होईल पात्र:
आज होत असलेल्या साखळी फेरीच्या शेवटच्या सामन्यात पंजाबला चेन्नई विरुद्ध ५३ धावांनी किंवा ३८ चेंडू राखून विजय मिळवणे आवश्यक आहे, असं झाल्यास पंजाब १४ गुणांसह चौथ्या स्थानावर राहील.

राजस्थान संघ असा होईल पात्र:
पंजाब विरुद्ध चेन्नई सामन्यात चेन्नईचा विजय किंवा चेन्नई ५३ धावांनी किंवा ३८ चेंडू राखून अश्या फरकाने पराभूत होऊ नये. असं झाल्यास राजस्थान १४ गुणांसह चौथ्या स्थानांवर राहील.

 

क्रिकेटप्रेमीं आहात? आमचे हे रविवारचे भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार हे खास सदर नक्की वाचा-

-भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ७ – खेडेगावातील सुपरस्टार

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ६– विचित्र शैलीचा मोहंती

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ५– लढवय्या साईराज बहुतुले!

-भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ४– दैव देते, कर्म नेते!!

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ३– वन मॅच वंडर 

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग २– एक स्कॉलर खेळाडू

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग १– पाकिस्तानविरुद्धचा चौकार आणि कानिटकर

महत्त्वाच्या बातम्या-

सिंधुला बॅडमिंटनमध्ये दुहेरीत जोडीदार म्हणुन हवा धोनी !

२० वर्षाच्या रिषभ पंतने आज जे केले ते अनेकांना ११ आयपीएलमध्ये करता आले नाही

साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यासाठी मुंबईकडून एक मोठा बदल

टी२०मध्ये ५२८ चौकार आणि तेवढ्याच षटकारांची बरसात करणारा तो पहिलाच खेळाडू

धोनीकडून मिळली किदांबी श्रीकांतला खास भेट!

राफेल नदालबद्दल या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

 

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment