हैद्राबाद। आज आयपीएलमध्ये सनरायजर्स हैद्राबाद विरूद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब संघात सामना रंगणार आहे. हा सामना हैद्राबादच्या घरच्या मैदानावर होणार असून रात्री 8 वाजता या सामन्याला सुरूवात होईल.
आयपीएल 2018 मध्ये या दोन्ही संघांनी आत्तापर्यंत 6 सामने खेळले आहेत. यात हैद्राबादने 4 सामन्यात विजय आणि 2 सामन्यात पराभव स्विकारला आहे. तर पंजाब 6 सामन्यांपैकी फक्त एकाच सामन्यात पराभवाला सामोरे गेले आहेत. बाकी 5 सामन्यात त्यांनी विजय मिळवला आहे.
या दोन संघांमध्ये याआधीही 19 एप्रिलला सामना झाला आहे. या सामन्यात पंजाबने 15 धावांनी विजय मिळवला होता. तसेच या दोन संघांमध्ये आत्तापर्यंत 11 सामने झाले आहेत. यात हैद्राबादने 8 वेळा बाजी मारली आहे, तर पंजाबने 3 वेळा हैद्राबादवर विजय मिळवला आहे.
या मोसमात पंजाब चांगल्या फॉर्ममध्ये असून त्यांनी सलग 4 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. त्यामुळे आज किंग्ज इलेव्हन पंजाबची विजयी घौडदौड थांबवण्याचे आव्हान सनरायजर्स हैद्राबादला असेल.
हैद्राबादच्या फलंदाजीची मदार शिखर धवन, केन विलियम्सन, मनिष पांडे, युसुफ पठाण या खेळाडूंवर असेल तर गोलंदाजीची जबाबदारी राशिद खान, भुवनेश्वर कुमार,सिध्दार्थ कौल यांच्यावर असेल.
त्याचबरोबर पंजाबचा संघ फलंदाजीसाठी केएल राहुल आणि ख्रिस गेल यांच्यावर अवलंबून असेल. तसेच अष्टपैलु युवराज सिंगच्या कामगिरीकडेही सर्वांचे लक्ष असेल. पंजाबकडे गोलंदाजीसाठी स्वत: कर्णधार आर अश्विन, मोहित शर्मा, बरिंदग स्रान, मुजिब अर रहमान असे पर्याय आहेत.
कधी होईल आयपीएल २०१८ मधील सनरायजर्स हैद्राबाद विरूद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब सामना?
सनरायजर्स हैद्राबाद विरूद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब या संघांमध्ये आयपीएल २०१८ चा 25 वा सामना आज, 26 एप्रिलला होणार आहे.
कुठे होईल आयपीएल २०१८ मधील सनरायजर्स हैद्राबाद विरूद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यातील सामना?
सनरायजर्स हैद्राबाद विरूद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यातील आजचा सामना राजीव गांधी आंतराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, हैद्राबाद येथे होईल.
किती वाजता सुरु होणार आयपीएल २०१८ मधील सनरायजर्स हैद्राबाद विरूद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब सामना?
आयपीएल २०१८ मधील सनरायजर्स हैद्राबाद विरूद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब सामना आज रात्री ८.०० वाजता सुरु होईल. तसेच या सामन्यासाठी नाणेफेक रात्री ७.३० वाजता होईल.
कोणत्या टीव्ही चॅनेलवरून आयपीएल २०१८ मधील सनरायजर्स हैद्राबाद विरूद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब सामना प्रसारित होईल?
आयपीएल २०१८ मधील सनरायजर्स हैद्राबाद विरूद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब सामना स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १ एचडी, स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १ आणि स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १ एचडी या चॅनल्सवरून इंग्लिश समालोचनासह प्रसारित होईल. तसेच स्टार स्पोर्ट्स १ हिंदी , स्टार स्पोर्ट्स १ हिंदी एचडी यावरून हिंदी समालोचनासह हा सामना प्रसारित होईल.
आयपीएल २०१८ मधील सनरायजर्स हैद्राबाद विरूद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब सामना ऑनलाईन कसा पाहता येईल?
आयपीएल २०१८ मधील सनरायजर्स हैद्राबाद विरूद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब सामन्याचे ऑनलाईन प्रसारण हॉटस्टार आणि जिओ टीव्हीवर होणार आहे.
यातून निवडले जातील ११ जणांचे संघ:
सनरायजर्स हैद्राबाद: केन विल्यमसन ( कर्णधार ), शिखर धवन, वृद्धीमान साहा, मनिष पांडे, शाकिब अल हसन, दिपक हुडा,भुवनेश्वर कुमार, युसुफ पठाण,राशिद खान, सिध्दार्थ कौल, ख्रिस जॉर्डन, तन्मय अग्रवाल, खलिल अहमद, बसिल थम्पी, रिकी भुई, बिपूल शर्मा, कार्लोस ब्रेथवेट, श्रीवत्स गोस्वामी, अलेक्स हेल्स, मेहेदी हसन, मोहम्मद नबी, टी नटराजन, सचिन बेबी, संदिप शर्मा, बिली स्टानलेक
किंग्ज इलेवन पंजाब: आर अश्विन ( कर्णधार ), ख्रिस गेल , के एल राहूल , अॅरोन फिंच, मंयक अग्रवाल,युवराज सिंग, करूण नायर, मोहित शर्मा, बरिंदग स्रान, मुजिब अर रहमान, अॅड्रे टाय, अक्षदिप नाथ, मंयक दागर, बेन द्वारशूईस, मंजूर दार, डेविड मिलर, अक्षर पटेल, अंकीत राजपूत, प्रदिप साहू, मार्कस स्टोनिस, मनोज तिवारी
महत्त्वाच्या बातम्या –
-अबब! पुढील ५ वर्षात होणार क्रिकेटचे ६ वर्ल्डकप
-संपूर्ण वेळापत्रक: असे होतील भारताचे विश्वचषक 2019चे सामने
-यारे या सारे या! आता १०४ देश खेळणार आंतरराष्ट्रीय टी२० सामने
-ना धोनी- ना विराट, आयपीएलमध्ये हवा तर याच खेळाडूची
-धोनी चाहत्यांसाठी ही आहे महत्त्वाची आकडेवारी
-या कारणामुळे विराटला झाला 12 लाख रूपयांचा दंड
-बीसीसीआयची फसवणूक करणारा खेळाडू आयपीएलमध्ये चमकला