---Advertisement---

नीरज चोप्रा डायमंड लीगमध्ये दुसऱ्या स्थानी; केवळ इतक्या सेंटीमीटरने अव्वल स्थान हुकले

Neeraj Chopra
---Advertisement---

नीरज चोप्राने ब्रुसेल्स येथे झालेल्या डायमंड लीग 2024 च्या अंतिम फेरीत दुसरे स्थान पटकावले आहे. भालाफेकमध्ये नीरजला सलग दुसऱ्या वर्षी उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्याचा सर्वोत्तम थ्रो 87.86 मीटर होता. परंतु ग्रेनेडाचा अँडरसन पीटर्स त्याच्यापेक्षा फक्त 0.01 मीटर पुढे होता. पीटर्सचा सर्वोत्तम थ्रो 87.87 मीटर होता. ज्यामुळे तो डायमंड लीग 2024 मध्ये भालाफेकचा चॅम्पियन बनला.

नीरज पहिला प्रयत्नात 86.82 मीटर थ्रो केला. परंतु त्याचा सर्वात कठीण प्रतिस्पर्धी अँडरसन पीटर्सने 87.87 मीटर अंतरावर पहिलाच थ्रो फेकला. याच थ्रोने शेवटी पीटर्सला विजेतेपद मिळवून दिले. नीरज चोप्राचा दुसरा थ्रो 84 मीटरपेक्षा कमी असला तरी तिसऱ्या थ्रोमध्ये त्याने 87.86 मीटर अंतर कापले आणि तो चॅम्पियन होण्यात फक्त 1 सेंटीमीटरने मुकला. भारतीय स्टारचा शेवटचा थ्रो 86 मीटरपेक्षा जास्त होता, पण तो चॅम्पियन होऊ शकला नाही.

डायमंड लीगचा चॅम्पियन बनणाऱ्या खेळाडूला 30 हजार अमेरिकन डॉलर्स मिळतात. म्हणजेच ग्रेनेडाच्या अँडरसन पीटर्सला सुमारे 25 लाख रुपयांची बक्षीस रक्कम दिली जाईल. तर नीरज चोप्राला 12 हजार डॉलर्स म्हणजेच सुमारे 10 लाख रुपये बक्षीस म्हणून दुसऱ्या क्रमांकावर येणार आहे.

नीरज चोप्रा कदाचित 2024 मध्ये डायमंड लीग चॅम्पियन बनला नसला तरी ही तो दोन वर्षांपूर्वी हे विजेतेपद जिंकण्यात तो यशस्वी झाला होता. त्या वर्षी, नीरजने अंतिम फेरीत 88.44 मीटर भालाफेक करून डायमंड लीग चॅम्पियन होण्याचा ऐतिहासिक पराक्रम केला. 2023 बद्दल बोलायचे झाल्यास झेक प्रजासत्ताकचा याकुब वालेश 84.24 मीटर अंतर कापून चॅम्पियन बनला. तर नीरज 83.80 मीटर भालाफेक करून दुसऱ्या स्थानावर राहिला.

हेही वाचा-

वनडेमध्ये एकही षटकार न मारता सर्वाधिक शतक करणारे फलंदाज
विराट की रोहित, सुवर्णपदक विजेत्या भालाफेकपटू नवदीप सिंगचा आवडता क्रिकेटर कोण?
बांगलादेशच्या नाहिद राणाचा सामना करण्यासाठी कोच गंभीरचा मास्टर प्लान, ताफ्यात नव्या भिडूची एन्ट्री

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---