इंडियन प्रीमियर लीगच्या 12व्या (आयपीएल 2019) मोसमासाठीचा लिलाव येत्या 18 डिसेंबरमध्ये जयपूर येथे घेण्यात येणार आहे, असे बीसीसीआयने घोषित केले. भारतीय वेळेप्रमाणे रात्री 7 वाजता सुरू होणारा हा लिलाव 10 पर्यंत सुरू असण्याची शक्यता आहे.
याआधी हा लिलाव दोन दिवस चालत असे. यंदा मात्र एकाच दिसवात हा लिलाव पार पडणार आहे. तसेच बेंगलुरूमध्ये होणारा हा लिलाव जयपूरमध्ये हलवण्यात आला आहे.
या लिलावाआधी संघ कायम ठेवलेले आणि लिलावासाठी उपलब्ध असलेल्या खेळाडूंची नावे जाहिर करणार आहेत.
किंग्ज इलेवन पंजाबने युवराज सिंगला तर दिल्ली डेयरडेविल्सने गौतम गंभीर यांना संघातून मुक्त केले आहे. तसेच राजस्थान रॉयल्सनेही जयदेव उनाडकटला मुक्त केले आहे.
सनरायजर्स हैद्राबादने दुखापतग्रस्त वृध्दिमान साहा आणि विंडीजचा खेळाडू कार्लोस ब्रेथवेट या दोघांना मुक्त केले असून ते या लिलावासाठी उपलब्ध आहेत.
तसेच मुंबई इंडियन्सनेही पॅट कमिन्स, जेपी ड्युमिनी आणि मुस्तफिजुर रहमान या आतंरराष्ट्रीय खेळाडूंना मुक्त केले आहे.
या सामन्यांच्या काळातच भारतात निवडणुका असणार आहे. यामुळे आयपीएलचे सामने भारताबाहेर होण्याची दाट शक्यता आहे.
“सार्वजनिक निवडणुका आणि आयपीएलच्या सामन्यांच्या तारखा सारख्याच असल्या तर सामने भारताबाहेर होऊ शकतात. सध्या आयपीएलचे वेळापत्रक तयार करण्यात आले नाही”, असे आयपीएलचे अध्यक्ष राजीव शुक्ला म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या:
–भारत विरुद्धच्या सामन्याआधी या ऑस्ट्रेलियन फलंदाजाला बसला मोठा धक्का
–मिताली राजच्या अडचणीत वाढ; कर्णधार हरमनप्रीत कौर, स्म्रीती मानधनाने केला मोठा खूलासा
–हॉकी विश्वचषक २०१८: चीन-आयर्लंड पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत