इंडियन प्रीमियर लीगच्या 12व्या (आयपीएल 2019) मोसमासाठीचा लिलाव पुढील महिन्यात म्हणजेच डिसेंबरमध्ये जयपूर येथे घेण्यात येणार आहे. 18 डिसेंबरला भारतीय वेळेप्रमाणे रात्री 7 वाजता सुरू होणारा हा लिलाव 10 पर्यंत सुरू असण्याची शक्यता आहे.
मुंबई मिररच्या रिपोर्टनुसार, या लिलावाच्या वेळेमध्ये बदल देखील होऊ शकतो. स्टार स्पोर्ट्सला या लिलावासाठी जास्तीत जास्त प्रेक्षक मिळावे म्हणून ते कदाचित हा लिलाव रात्री 7-10 या दरम्यान ठेऊ शकतात.
2018च्या आयपीएलचा लिलाव बेंगलुरूमध्ये जानेवारी 27 आणि 28 असे दोन दिवस चालला होता. त्यावेळी तो सकाळी सुरू झाला होता. मात्र यावेळेस तो एकच दिवस ते पण रात्री ठेवला जाणार आहे.
14 डिसेंबरला भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाचा दुसरा कसोटी सामना आहे. सकाळी 7.30 सुरू होणारा हा सामना दुपारी 3 वाजेपर्यंत खेळला जाणार असल्याने सामन्यामध्ये कोणताच व्यत्यय येणार नाही.
तसेच 2019ला भारतात निवडणुका असल्याने आयपीएलचे सामने भारताबाहेर होण्याची दाट शक्यता आहे.
“सार्वजनिक निवडणुका आणि आयपीएलच्या सामन्यांच्या तारखा सारख्याच असल्या तर सामने भारताबाहेर होऊ शकतात. सध्या आयपीएलचे वेळापत्रक तयार करण्यात आले नाही”, असे आयपीएलचे अध्यक्ष राजीव शुक्ला म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या:
–रोहित शर्माची नवी टी२० क्रमवारी तुम्हाला माहित आहे का?
–अबब ! कसोटी क्रिकेटमध्ये आज घडला अजब कारनामा