आयपीएल 2019ची स्पर्धा शेवटच्या टप्प्यात आली आहे. येत्या रविवारी या आयपील मोसमाचा अंतिम सामना हैद्राबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सने आधीच प्रवेश केला आहे.
तसेच आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात होणाऱ्या क्वाॅलिफायर 2 मध्ये जो संघ जिंकेल तो अंतिम सामन्यात प्रवेश करणारा दुसरा संघ ठरेल.
त्यामुळे आता चाहत्यांना अंतिम सामन्याची उत्सुकता लागली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या अंतिम सामन्याची तिकीटे केवळ 2 मिनिटात संपली आहेत. यामुळे आयपीएलची लोकप्रियता लक्षात येत आहे. परंतू दुसरी बाजू म्हणजे काही मिनीटात तिकीटांची विक्री झाल्याने तिकीट विक्रीच्या पारदर्शकतेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत.
बीसीसीआयने रविवारी अंतिम सामन्यासाठी कोणतीही नोटीस न देता तिकीट विक्री सुरु केली होती. यानंतर काही मिनिटात तिकीटांची विक्री झाली आहे. याबद्दल हैद्राबाद क्रिकेट असोसिएशन (एचसीए)च्या कार्यकारी समितीच्या एका सदस्याने प्रश्न उपस्थित केला आहे.
ते म्हणाले ‘सामन्याची तिकीटे केवळ 2 मिनिटात कशी काय विकली जाऊ शकतात. सर्वांची नजर याच सामन्यावर होती का, किंवा सर्व जण पहिल्यापासूनच वाट पाहत होते का? किंवा याचा काही वेगळा अर्थही निघू शकतो. ही खूप आश्चर्याची गोष्ट आहे. क्रिकेटप्रेमी यामुळे खूप नाराज आहेत. त्यामुळे बीसीसीआयला याचे उत्तर द्यावे लागेल.’
सूत्रांच्या माहीती नुसार तिकींटांची विक्री इव्हेंट्स नाऊ करत आहेत. तसेच आधी 1000, 1500 ,2000, 2500, 5000, 10000, 12500, 15000 आणि 22500 रूपयांची तिकीटे विकली जाणार होती. पण नंतर माहिती मिळाली की फक्त 1500, 2000, 2500 आणि 5000 रुपयांचीच तिकाटे विकली गेली आहेत. अन्य तिकीटांचे काय झाले याबद्दल कोणतीही माहिती नाही.
याबद्दल इव्हेंट्स नाऊचे अधिकारी सुधीर रेड्डी म्हणाले, ‘याविषयी मी काही सांगू शकत नाही. या प्रकरणाची सगळी माहीती तुम्हाला बीसीसीआयकडूनच मिळू शकते. मला या विषयी काहीही सांगण्याचा अधिकार नाही.’
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–भारताकडे चौथ्या क्रमांकासाठी हा खेळाडू आहे चांगला पर्याय, दिग्गज क्रिकेटपटूचे मत
–रिषभ पंतने पॉवरफुल षटकार मारण्यामागील कारणाचा केला खूलासा
–पंतने केला आपल्याच कर्णधाराला विरोध, श्रेयस अय्यरला बदलावा लागला निर्णय, पहा व्हिडिओ






