fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

मुंबई इंडियन्सने घडवला इतिहास; चौथ्यांदा जिंकले आयपीएलचे विजेतेपद

हैद्राबाद। आज(12 मे) आयपीएल 2019मधील अंतिम सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पार पडला. शेवटच्या षटकापर्यंत रोमांचकारी झालेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सने 1 धावेने विजय मिळला आणि चौथ्यांदा आयपीएलचे विजेतेपद मिळवण्याचा इतिहास रचला.

या सामन्यात 150 धावांचा पाठलाग करताना चेन्नईकडून शेन वॉटसनने अर्धशतकी खेळी करताना 59 चेंडूत 80 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 8 चौकार आणि 4 षटकार मारले.

तसेच सुरुवातीला फाफ डु प्लेसिसने चांगली सुरुवात करताना 13 चेंडूत 26 धावांची खेळी केली. या छोटेखानी खेळीत त्याने 3 चौकार आणि 1 षटकार मारला. अन्य फलंदाजांना मात्र खास काही करता आले नाही.

मुंबईकडून जसप्रीत बुमराहने 2 तर राहुल चहर, लसिथ मलिंगा आणि कृणाल पंड्याने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

तत्पूर्वी मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 बाद 149 धावा केल्या होत्या. मुंबईकडून अष्टपैलू किरॉन पोलार्डने सर्वाधिक नाबाद 41 धावा केल्या. तर चेन्नईकडून दिपक चहरने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर इम्रान ताहिर आणि शार्दुल ठाकूरने प्रत्येकी 2 विकेट घेतली.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

रैना झाला ८ धावांवर बाद आणि आयपीएलमधील खास विक्रमावर झाले कोहलीचे शिक्कामोर्तब

…म्हणून पोलार्डने रागाने हवेत फेकली बॅट, पहा व्हिडिओ

चक्क चाहत्याने मुंबई इंडियन्सला सुचवली चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध जिंकण्याची योजना

You might also like