---Advertisement---

आयपीएल २०१९: बेअरस्टो, वॉर्नरने शतकी खेळीबरोबर रचले विक्रमांचेही डोंगर…

On: रविवार, मार्च 31, 2019 6:46 PM
---Advertisement---

हैद्राबाद। आयपीएल 2019 मध्ये आज(31 मार्च) सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात सामना सुरु आहे. या सामन्यात बेंगलोरने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण हा निर्णय जॉनी बेअरस्टो आणि डेव्हिड वॉर्नर या हैद्राबादच्या सलामीवीरांनी चूकीचा ठरवत शतकी खेळी केली.

या दोघांनी मिळून सलामीला तब्बल 185 धावांची भागीदारी रचली. बेअरस्टोने 56 चेंडूत 203.57 च्या स्ट्राईक रेटने 114 धावा केल्या. या खेळीत त्याने 12 चौकार आणि 7 षटकार मारले. त्याला युजवेंद्र चहलने बाद केले. तसेच वॉर्नरने 55 चेंडूत 5 चौकार आणि 5 षटकारांसह नाबाद 100 धावा केल्या.

त्यामुळे हैद्राबादने या दोघांच्या शतकाच्या जोरावर प्रथम फलंदाजी करताना 2 बाद 231 धावा केल्या आहेत.

बेअरस्टो आणि वॉर्नरने केले हे खास विक्रम-

– रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारे क्रिकेटपटू :

710 – एमएस धोनी

669 – डेव्हि़ड वॉर्नर

661 – रोहित शर्मा

661 – सुरेश रैना

647 – गौतम गंभीर

– डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो ही एकाच टी20 सामन्यात शतके करणारी दुसरीच सलामीवीरांची जोडी. याआधी केविन ओब्रायन आणि हाशिम मार्शल या जोडीने ग्लूस्टरशायरकडून सलामीला खेळताना 2011 मध्ये मिडलसेक्स विरुद्ध शतके केली होती.

– टी20 क्रिकेटमध्ये एकाच डावात दोन खेळांडूंनी शतके करण्याची ही चौथी वेळ. याआधी असा पराक्रम करणारे खेळाडू –

1. केविन ओब्रायन आणि हाशिम मार्शल (ग्लूस्टरशायर विरुद्ध मिडलसेक्स, 2011)

2. विराट कोहली आणि एबी डिविलियर्स (रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध गुजरात लायन्स,2016)

3. ऍलेक्स हेल्स आणि रिली रॉसॉव (रंगपूर रायडर्स विरुद्ध चितगाँग विकिंग्स,2019)

4. डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो (सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, 2019)

– आयपीएलमध्ये सर्वाधिक शतके करणारे क्रिकेटपटू: 

6 – ख्रिस गेल

4 – विराट कोहली, शेन वॉटसन, डेव्हिड वॉर्नर

3 – एबी डिविलियर्स

– आयपीएलमधील सर्वोच्च सलामी भागीदारी:  

185 धावा – डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो (2019)

184* धावा – गौतम गंभीर आणि ख्रिस लिन (2017)

167 धावा – ख्रिस गेल आणि तिलत्करने दिलशान (2013)

163 धावा – सचिन तेंडूलकर आणि ड्वेन स्मिथ (2012)

– आयपीएलमध्ये सर्वात कमी डावात पहिले शतक करणारे खेळाडू:

1 डाव – ब्रेंडन मॅक्यूलम, माइक हसी

3 डाव – अँड्र्यू सायमंड, जॉनी बेअरस्टो

4 डाव – ऍडम गिलख्रिस्ट, मनिष पांडे, पॉल वॉलथटी

महत्त्वाच्या बातम्या – 

आयपीएल २०१९: मैदानात पाऊल ठेवताच या १६ वर्षीय प्रयासने केला मोठा पराक्रम

१ धावेने शतक हुलकेल्या पृथ्वी शॉने केली रैना, कोहलीच्या अनोख्या विक्रमाची बरोबरी

एन्गिडी ऐवजी चेन्नई सुपर किंग्स संघात सामील होणार हा क्रिकेटपटू…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment