या हंगामात किंग्ज इलेव्हन पंजाबच्या संघाला पहिल्या ६ सामन्यांपैकी ५ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. जर पंजाब संघाने पुढील काही सामने गमावले तर आयपीएलच्या या सत्रातुन ते बाहेर पडतील. आश्चर्याची बाब म्हणजे किंग्ज इलेव्हन पंजाबला अद्याप त्याचा संतुलित असा अंतिम ११ खेळाडूंचा संघ मैदानात उतरवता आला नाही.
या हंगामात किंग्ज इलेव्हन पंजाब संघासाठी दोन फलंदाजांनी जबरदस्त कामगिरी बजावली. कर्णधार केएल राहुलने या हंगामात सर्वाधिक ३१३ धाव केल्या असून तो यंद्याच्या हंगामात सध्या सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. याशिवाय सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पहिल्या ५ मध्ये मयंक अगरवालचा देखील समावेश आहे. हे सर्व असूनही किंग्ज इलेव्हन पंजाबचा संघ गुणक्रमवारीत सर्वात शेवटी आहे.
किंग्ज इलेव्हन पंजाबची सर्वात मोठी कमजोर बाजू म्हणजे त्यांची गोलंदाजी आणि मधल्या फळीतील फलंदाजी आहे. डेथ ओव्हर्समध्ये (शेवटची काही षटके) संघाने बर्याच धावा दिल्या आहेत आणि ग्लेन मॅक्सवेल सारखा खेळाडू मधल्या फळीत फ्लॉप झाला आहे. अशा परिस्थितीत पंजाबच्या संघाला आता लवकरच काहीतरी निर्णय घेण्याची गरज आहे अन्यथा या हंगामात आयपीएल जिंकण्याची त्यांची आशा संपुष्टात येईल.
या लेखात अशा ३ खेळाडूंचा उल्लेख आहे, ज्यांना या हंगामात पंजाबकडून आतापर्यंत एकही सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही. त्या खेळाडूंना संघाने संधी द्यावी आणि कदाचित त्यांच्या येण्यामुळे संघाचे संयोजन योग्य होईल.
किंग्ज इलेव्हन पंजाब संघामध्ये पुढील सामन्यात या 3 खेळाडूंचा समावेश असायला हवा
३. दीपक हूडा
दीपक हूडा हा एक जबरदस्त खेळाडू आहे. मागील हंगामापर्यंत तो सनरायझर्स हैदराबाद संघाचा सदस्य होता. परंतु या हंगामात किंग्ज इलेव्हन पंजाबने त्याला विकत घेतले. दीपक हूडा मधल्या फळीत फलंदाजीस येऊन डाव सावरू शकतो आणि तो एक मॅच विनर खेळाडू आहे. आयपीएलमध्ये त्याला बराच अनुभव आहे. तो जबरदस्त फलंदाजी करण्यास सक्षम आहे. याशिवाय गरज पडल्यास तो गोलंदाजी देखील करू शकतो.
दीपक हूडाला अद्याप एकही सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही, हे आश्चर्यकारक आहे. त्यांच्या अंतिम आकारामध्ये समावेश केला पाहिजे.
२. हार्डस विल्जॉइन
किंग्स इलेव्हन पंजाबच्या दोन परदेशी गोलंदाजांची कामगिरी या मोसमात आतापर्यंत चांगली राहिली नाही. शेल्डन कोट्रेल आणि ख्रिस जॉर्डन हे खूपच महागडे ठरले आहेत, त्यामुळे आता पुढच्या सामन्यात जबरदस्त गोलंदाज असलेल्या हार्डस विल्जोईनला संघ व्यवस्थापनाने संधी द्यायला हवी.
गेल्या हंगामात हार्डस विल्जोईनची चांगली कामगिरी होती आणि या मोसमातही तो संघासाठी वेगवान गोलंदाज म्हणून एक चांगला पर्याय ठरू शकतो.
१. ख्रिस गेल
ख्रिस गेलला अद्याप एकही सामना न खेळवण्याचा निर्णय आश्चर्यकारक आहे. केएल राहुल आणि मयंक अगरवाल यांच्या सलामी जोडीने चांगली कामगिरी बजावली असली तरी गेलसारख्या मोठ्या खेळाडूला बाहेर बसवणे संघासाठी घातक ठरत असल्याचे दिसत आहे.
ग्लेन मॅक्सवेल सातत्याने फ्लॉप होत आहे, त्यामुळे आता पुढील सामन्यात गेलला संधी द्यायला हवी. तो स्वतःहून कोणताही सामना जिंकून देऊ शकतो. त्याच्याकडे सुरुवातील गोलंदाजांवर आक्रमण करण्याचे चांगले तंत्र आहे.
ट्रेंडिंग लेख –
टी-२० विश्वचषक २०१२ : क्रिकेट जगतातील रावडी संघाला गतवैभव मिळवून देणारी स्पर्धा
शेन वॉर्नने त्याला म्हटले होते भारताचा मोठा स्टार; पण ‘तो’ अचानकच झाला आयपीएलमधून गायब आणि आता…
किस्से क्रिकेटचे – मैदानावर हत्ती आला आणि भारतीय संघाने इंग्लंडमध्ये विजयाचा श्रीगणेशा केला
महत्त्वाच्या बातम्या –
महिला आयपीएलचे सामने होणार युएईमधील ‘या’ शहरात?
IPL 2020 : आज पंजाब-कोलकाता आणि चेन्नई-बेंगलोर येणार आमने-सामने, जाणून घ्या सामन्यांबद्दल सर्वकाही
IPL 2020: कोलकाताविरुद्धच्या सामन्यात ‘युनिवर्सल बॉस’ ख्रिस गेलचे होणार कमबॅक?






